Warren Buffett Resignation: वॉरन बफे यांचा ‘बर्कशायर हॅथवे’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा; आता कोण सांभाळणार महाकाय उद्योग समूह?

वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी ‘बर्कशायर हॅथवे’ (Berkshire Hathaway) या ट्रिलियन-डॉलर मूल्याच्या महाकाय समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोडण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

Warren Buffett Resignation: वॉरन बफे यांचा ‘बर्कशायर हॅथवे’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा; आता कोण सांभाळणार महाकाय उद्योग समूह?

Warren Buffett Resignation: जागतिक भागभांडवल बाजारात आणि गुंतवणुकीच्या विश्वात आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर जगभरातील गुंतवणूकदारांचे दैवत ठरलेले ज्येष्ठ उद्योगपती वॉरन बफे यांनी एका ऐतिहासिक अध्यायाचा समारोप केला आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी ‘बर्कशायर हॅथवे’ (Berkshire Hathaway) या ट्रिलियन-डॉलर मूल्याच्या महाकाय समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. सन 1970 पासून म्हणजेच सलग 56 वर्षे त्यांनी या जागतिक समूहाचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवले.  

तोट्यातील कापड गिरणी ते 1 ट्रिलियन डॉलरचे औद्योगिक साम्राज्य  

वॉरन बफे यांनी 1965 मध्ये एका आर्थिक संकटात सापडलेल्या कापड उत्पादक कंपनी म्हणून बर्कशायर हॅथवेची सूत्रे हाती घेतली होती. परंतु, आपल्या दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी पुढील 6 दशकांत या समूहाचा कायापालट करत त्याला विमा, रेल्वे, ऊर्जा, उत्पादन आणि किरकोळ विक्री क्षेत्रातील 1 ट्रिलियन डॉलरहून अधिक बाजारमूल्य असलेल्या बलाढ्य महामंडळात रूपांतरित केले.  या यशात त्यांनी 1967 मध्ये विकत घेतलेल्या 'नॅशनल इंडेम्निटी' या विमा कंपनीचे योगदान मोठे ठरले. विमा हप्त्यांच्या माध्यमातून जमा होणारा आणि दावे निकाली निघेपर्यंत उपलब्ध राहणारा निधी (इन्शुरन्स फ्लोट) अत्यंत चलाखीने इतर फायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवून त्यांनी भांडवलाचा प्रचंड साठा उभारला, ज्याने बर्कशायरच्या वाढीला मोठी गती दिली.

हेही वाचा – Lockdown in Pakistan: पाकिस्तानमध्ये भीषण इंधन संकटामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध; नवीन गाड्यांच्या खरेदीवर बंदी आणि लग्नात 'वन-डिश'चा नियम

पुढील पिढीकडे सोपवली व्यावसायिक कमान 

वॉरन बफे यांच्या या ऐतिहासिक निवृत्तीनंतर बर्कशायर हॅथवेच्या व्यवस्थापनात नवीन नेतृत्व पुढे आले आहे. वॉरन बफे यांचे सुपुत्र हॉवर्ड बफे, जे 1993 पासून संचालक मंडळात कार्यरत आहेत, आता कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत समूहाची मूळ मूल्ये व संस्कृती जपतील. तर दुसरीकडे, कंपनीचे दैनंदिन व्यवहार, नवीन गुंतवणुकीचे धोरणात्मक निर्णय आणि प्रशासकीय जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ग्रेग एबेल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number