Warehouse Collapse: बांधकाम सुरू असतानाच गोदाम पत्त्यासारखं कोसळलं; आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा

बांधकाम सुरू असलेल्या एका 3 मजली गोदामाचे छत अचानक कोसळल्याने आतापर्यंत 9 मजुरांचा मृत्यू झाला आहे.

Warehouse Collapse: बांधकाम सुरू असतानाच गोदाम पत्त्यासारखं कोसळलं; आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा

Warehouse Collapse: कोलकाता येथील ताराताला ट्रान्सपोर्ट डेपोजवळ बुधवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि मोठी दुर्घटना घडली होती. येथे बांधकाम सुरू असलेल्या एका 3 मजली गोदामाचे छत अचानक कोसळल्याने आतापर्यंत 9 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही सुमारे 20 ते 22 मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, घटनास्थळावर युद्धपातळीवर मदत व बचावकार्य राबवले जात आहे. बुधवारी, 24 मे रोजी गोदामाच्या छतावर काँक्रीट टाकण्याचे (कास्टिंग) काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांसाठी आता आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

मोठा आवाज झाला अन् बांधकाम कोसळले; प्रत्यक्षदर्शीची आपबिती
या अपघाताच्या वेळी घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचलेले स्थानिक दुकानदार सुरिंदर साव यांनी या भीषण परिस्थितीची माहिती दिली. काल दुपारी अचानक एक मोठा आवाज झाला, ज्यामुळे ते दुकानाबाहेर आले. समोर पाहताच बांधकाम सुरू असलेले संपूर्ण गोदाम पत्त्यासारखे कोसळले होते. त्यांनी तात्काळ इतर नागरिकांच्या मदतीने पोलीस आणि अग्निशमन दलाला या अपघाताची माहिती दिली. गोदामाजवळ गेल्यावर आतून मजुरांच्या किंचाळण्याचे आणि मदतीसाठी ओरडण्याचे आवाज येत होते. साव यांच्या दाव्यानुसार, अपघाताच्या वेळी तिथे 50 हून अधिक मजूर कार्यरत होते.

हेही वाचा – Vishal Sikka Hang Ten Systems : इन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्का यांची तंत्रज्ञान जगतात मोठी झेप; AI क्षेत्रातील नव्या स्टार्टअपची केली घोषणा

निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आरोप; मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोदामाच्या बांधकामामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा प्राथमिक आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. याच हलगर्जीपणामुळे छताचे कास्टिंग करताना संपूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळली. दरम्यान, या भीषण अपघाताची दखल घेत प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींच्या उपचारासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. ढिगाऱ्याखालून मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक यंत्रणांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number