Karbi Anglong Violence : घरांना आग, अनेकजण जखमी अन् तडकाफडकी कर्फ्यू लागू ! आसाममध्ये हिंसाचाराचा भडका; कारण काय?

संतप्त आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ करत थेट लोकप्रतिनिधींच्या घराला लक्ष्य केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

Karbi Anglong Violence : घरांना आग, अनेकजण जखमी अन् तडकाफडकी कर्फ्यू लागू ! आसाममध्ये हिंसाचाराचा भडका; कारण काय?

Karbi Anglong Violence : आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात चराई जमिनींवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. संतप्त आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ करत थेट लोकप्रतिनिधींच्या घराला लक्ष्य केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने संचारबंदी (Curfew) लागू केला असून पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीमाराचा वापर करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

ग्राम चराई राखीव (VGR) आणि व्यावसायिक चराई राखीव (PGR) जमिनींवर बेकायदेशीरपणे कब्जा करणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक संघटनांकडून आंदोलन केले जात आहेत. 22 डिसेंबर रोजी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी कार्बी आंगलोंग स्वायत्त परिषदेचे (KAAC) मुख्य कार्यकारी सदस्य तुलीराम रोंगांग यांच्या डोंगकामुकाम येथील वडिलोपार्जित घराला आग लावली. याशिवाय तीन दुचाकी आणि एका शाळेच्या बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष

हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 आंदोलक आणि काही सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली, ज्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी हवेत गोळीबार केला. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा दंडाधिकारी निरोला फांगचोपी यांनी BNS चे कलम 163 (जुन्या कलम 144 प्रमाणे) लागू केले असून 5 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली आहे.

हेही वाचा – Rashtriya Kisan Diwas 2025 : बळीराजाचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या सरकारच्या 5 महत्त्वाच्या योजना; जाणून घ्या सविस्तर

प्रशासनाचे कडक निर्बंध

दरम्यान, सायंकाळी 5 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नागरिक आणि खाजगी वाहनांच्या हालचालींवर पूर्णपणे बंदी आहे. रॅली, मशाल मिरवणुका, प्रक्षोभक भाषणे आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर सक्त मनाई करण्यात आली आहे. वैद्यकीय आणीबाणी, शाळा, महाविद्यालये (परीक्षांसाठी) आणि सरकारी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

हेही वाचा – Anurag Dwivedi: नववीतून शाळा सोडली आणि करोडपती यूट्युबर बनला.. आता सापडला ED च्या तडाख्यात!

मागण्या आणि कायदेशीर पेच

आंदोलकांचा असा दावा आहे की, बाहेरील राज्यांतील (प्रामुख्याने बिहारमधील) लोकांनी या चराई जमिनींवर बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये स्वायत्त परिषदेने अतिक्रमणे हटवण्याच्या नोटिसा जारी केल्या होत्या. मात्र, गुवाहाटी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे ही प्रक्रिया सध्या थांबलेली आहे. याच दिरंगाईमुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरला असून त्याचे रूपांतर आता हिंसाचारात झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number