Crude Oil: अमेरिकेने इराणवरील निर्बंध हटवले; भारताचा स्वस्त दरात कच्चे तेल मिळण्याचा मार्ग मोकळा

सध्या इराणच्या कच्च्या तेलाचा प्रचंड साठा समुद्रातील जहाजांवर पडून असून, अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतासह आशियाई देशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.<br/>

Crude Oil: अमेरिकेने इराणवरील निर्बंध हटवले; भारताचा स्वस्त दरात कच्चे तेल मिळण्याचा मार्ग मोकळा

Crude Oil: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी अमेरिकेने इराणवरील निर्बंधांमध्ये तात्पुरती सवलत जाहीर केली आहे. या निर्णयामुळे भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी (रिफायनरीज) इराणकडून पुन्हा तेल खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या इराणच्या कच्च्या तेलाचा प्रचंड साठा समुद्रातील जहाजांवर पडून असून, अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतासह आशियाई देशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेकडून 30 दिवसांची विशेष सवलत
अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन म्नुचिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाने समुद्रात अडकून पडलेल्या इराणी तेलाच्या खरेदीसाठी 30 दिवसांची तात्पुरती सवलत (Waiver) दिली आहे. ही सवलत प्रामुख्याने जहाजांवर साठवलेल्या तेलासाठी असून, ते अनलोड करण्यासाठी 19 एप्रिलची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यापासून निर्बंधांमधून सवलत देण्याची ही तिसरी वेळ आहे, ज्याचा मुख्य उद्देश जागतिक ऊर्जा संकट कमी करणे हा आहे.

समुद्रात 17 कोटी बॅरल्स तेलाचा साठा
'Kpler' या संस्थेच्या आकडेवारीनुसार, सध्या इराणचे सुमारे 170 दशलक्ष बॅरल्स (17 कोटी बॅरल्स) कच्चे तेल समुद्रात साठवलेले आहे. हे तेल मध्य-पूर्वेकडील आखातापासून ते चीनच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या जहाजांवर आहे. 'Energy Aspects' या संस्थेच्या अंदाजानुसार, हा साठा मध्यपूर्वेतील सुमारे 14 दिवसांच्या एकूण उत्पादनाइतका मोठा आहे. आशिया खंड आपल्या गरजेच्या 60 टक्के तेल मध्यपूर्वेकडून मिळवतो, त्यामुळे हा साठा उपलब्ध होणे बाजारपेठेसाठी अत्यंत कळीचे ठरणार आहे.

हेही वाचा – Indian LPG Tankers: भारतासाठी मोठी बातमी! मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान इराणने भारताला दिली 'स्पेशल एन्ट्री'; स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून तेलवाहू जहाजे धावणार

भारतीय रिफायनरीज सरकाराच्या निर्देशांच्या प्रतीक्षेत
'रॉयटर्स'च्या अहवालानुसार, भारतातील तीन मोठ्या तेल शुद्धीकरण कंपन्यांनी इराणकडून तेल खरेदी करण्यास रस दाखवला आहे. मात्र, पेमेंटच्या (देयकाच्या) अटी आणि व्यवहाराची पद्धत यावर केंद्र सरकारकडून अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे येणे बाकी आहे. भारताचा कच्च्या तेलाचा साठा सध्या इतर आशियाई देशांच्या तुलनेत कमी असल्याने, इराणकडून होणारी ही खरेदी भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number