Petrol-Diesel Crisis in India : अमेरिकेच्या एका निर्णयाने जागतिक बाजारात हाहाकार! भारतावर पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचे मोठे संकट येणार?

अमेरिकेच्या या नव्या पवित्र्यामुळे भारताला ज्या गोष्टीची सर्वात जास्त भीती होती नेमके तेच घडल्याचे पाहायला मिळत आहे.

Petrol-Diesel Crisis in India : अमेरिकेच्या एका निर्णयाने जागतिक बाजारात हाहाकार! भारतावर पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचे मोठे संकट येणार?

Russian Oil ban impact on India : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक अत्यंत वाईट आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका तडकाफडकी निर्णयामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावरील तात्पुरती सूट पुढे वाढवण्यास साफ नकार दिला आहे. अमेरिकेच्या या नव्या पवित्र्यामुळे रशियाच्या तेलावर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू झाले असून, भारताला ज्या गोष्टीची सर्वात जास्त भीती होती नेमके तेच घडल्याचे पाहायला मिळत आहे.

होर्मुझ खाडीतील तणावादरम्यान भारताला बसला मोठा धक्का
सध्या पश्चिम आशियातील बिघडलेली परिस्थिती आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील (होर्मुज खाडी) वाढत्या तणावामुळे आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा विसकळीत झाला आहे. या कठीण काळात भारताच्या मदतीला रशिया धावून आला होता आणि भारताला आवश्यक तेवढ्या तेलाचा पुरवठा रशियाकडून सातत्याने केला जात होता. मात्र, आता अमेरिकेने रशियन तेलावरील सवलत रद्द केल्यामुळे भारतासाठी हा खरोखरच एक अत्यंत मोठा आणि अनपेक्षित धक्का मानला जात आहे. जागतिक बाजारातील तज्ज्ञांना अशी अपेक्षा होती की, सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता अमेरिका रशियावरील निर्बंधांना काही दिवसांसाठी पुढे ढकलून दिलासा देईल; परंतु, प्रत्यक्षात ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाने सर्वांचीच झोप उडवली आहे.

हेही वाचा – SC Judges Strength Increase: सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढणार; राष्ट्रपतींची सुधारणा अध्यादेशाला मंजुरी, आता 'इतकी' असेल न्यायाधीशांची संख्या

देशात वाढणार इंधनाचे दर; महागाईचा भडका उडण्याची भीती
भारतामध्ये कच्च्या तेलाची आणि इंधनाची मागणी प्रचंड मोठी आहे. अशा स्थितीत रशियाकडून होणारी तेल खरेदी अचानक बंद झाल्यामुळे भारताचे टेन्शन कमालीचे वाढले आहे. आता सर्वात गंभीर प्रश्न हा निर्माण झाला आहे की, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेल नक्की कुठून आणि कसे आयात करायचे? आधीच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या असताना, या नवीन संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडतील. याचा थेट परिणाम म्हणून भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात असून यामुळे देशात मोठी महागाई येण्याची शक्यता आहे. तसेच, काही तज्ज्ञ परिस्थिती अधिक बिघडल्यास लॉकडाऊनचीही भीती व्यक्त करत आहेत.

केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जागतिक बाजारपेठ संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या एका निर्णयामुळे केवळ भारताचीच कोंडी झाली आहे असे नाही, तर संपूर्ण जागतिक इंधन बाजारपेठ देखील मोठ्या संकटात सापडली आहे. रशियन तेलाच्या पुरवठ्यावर बंदी आल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा पुरवठा आणि मागणी यातील समतोल बिघडून दबाव अधिक तीव्र होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एकूणच या आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींमुळे भारतासमोर इंधनाचे मोठे संकट उभे राहिले असून, संपूर्ण अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Milk Price Hike: सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! अमूलनंतर आता 'या' कंपनीनेही वाढवले दुधाचे दर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number