Indian Employees Layoff: अमेरिकन बँकेचा धक्कादायक निर्णय; 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी गेली

5 मिनिटांच्या गुगल मीट बैठकीत 80 भारतीय कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढण्यात आले. बँकेने खराब कामगिरीचे कारण दिले असले तरी कर्मचाऱ्यांनी ते फेटाळून लावले आहे.

Indian Employees Layoff: अमेरिकन बँकेचा धक्कादायक निर्णय; 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी गेली

Indian BPO Jobs: कॉर्पोरेट जगतातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर यासंदर्भातील एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. एका अमेरिकन बँकेने भारतातील आपल्या संपूर्ण कस्टमर सर्व्हिस टीमला अवघ्या 5 मिनिटांच्या गुगल मीट कॉलवर नोकरीवरून काढून टाकल्याचा दावा करण्यात आला आहे. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे एकाच वेळी सुमारे 80 भारतीय कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून आयटी आणि बीपीओ क्षेत्रातील नोकरीच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ऑपरेशनल कारणांचे सांगून 5 मिनिटांत घेतला निर्णय
रेडिटवर एका बाधित कर्मचाऱ्याने आपबिती शेअर करताना सांगितले की, संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होणाऱ्या शिफ्टपूर्वी कर्मचाऱ्यांना कामाच्या कारणास्तव वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर रात्री सुमारे 9.30 वाजता वरिष्ठ व्यवस्थापनासोबत एका तातडीच्या गुगल मीट कॉलचे आयोजन करण्यात आले. प्रकल्पाची काही महत्त्वाची माहिती दिली जाईल असे कर्मचाऱ्यांना वाटत असतानाच, व्यवस्थापनाने थेट सर्वांची सेवा तातडीने समाप्त करण्यात आल्याची घोषणा केली. अवघ्या 5 मिनिटांच्या या बैठकीत 80 कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार हिरावला गेला.

हेही वाचा – Tech Hub layoffs: भारतात टेक कंपनीत मोठी नोकरकपात; एकाच झटक्यात 50 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

खराब कामगिरीचा दावा आणि कर्मचाऱ्यांचा आक्षेप
बँक व्यवस्थापनाने या कामगार कपातीमागे खराब कामगिरी (Poor Performance) आणि आउटपुटचे कारण दिले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी या तर्कावर तीव्र आक्षेप घेतला आहे. जर प्रश्न वैयक्तिक कामगिरीचा असता तर काही ठराविक कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असती, परंतु संपूर्ण 80 जणांच्या टीमला एकाच वेळी कसे काढले जाऊ शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जरी या रेडिट पोस्टमध्ये बँकेच्या नावाचा उल्लेख केलेला नाही आणि या वृत्ताची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही, तरीही या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

व्हिडिओ कॉलवरील कपातीमुळे मानसिक आघात
डिजिटल आणि हायब्रिड कामाच्या काळात कंपन्यांसाठी हजारो मैल दूर असलेल्या कर्मचाऱ्यांना काढणे सोपे झाले असले तरी अशा पद्धतींमुळे मोठा मानसिक आघात होतो. वैयक्तिकरित्या संवाद साधण्याऐवजी एकाच वेळी 80 कर्मचाऱ्यांना गुगल मीटवर एकत्र आणून अचानक कामावरून काढून टाकणे हे अत्यंत असंवेदनशील मानले जात आहे. अचानक नोकरी गेल्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर घराचा खर्च, कर्जाचे हप्ते (EMI) आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा – DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात DA मध्ये 8 टक्क्यांनी वाढ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number