UIDAI Safety Tips : सावधान! तुमचे आधार कार्ड रिकामे करू शकते बँक खाते; फसवणूक टाळण्यासाठी UIDAI ने दिल्या ‘या’ 5 महत्त्वपूर्ण टिप्स

या पार्श्वभूमीवर, UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने नागरिकांना त्यांचे आधार सुरक्षित ठेवण्यासाठी 5 मोलाचे सल्ले दिले आहेत.<br/>

UIDAI Safety Tips : सावधान! तुमचे आधार कार्ड रिकामे करू शकते बँक खाते; फसवणूक टाळण्यासाठी UIDAI ने दिल्या ‘या’ 5 महत्त्वपूर्ण टिप्स

UIDAI Safety Tips : आजच्या डिजिटल युगात 'आधार कार्ड' हे केवळ ओळखपत्र राहिले नसून, ते आपल्या आर्थिक व्यवहारांचा कणा बनले आहे. मात्र, थोडीसा निष्काळजीपणा तुम्हाला सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकवू शकतो. आधार कार्डचा गैरवापर करून बँक खात्यातून पैसे लंपास होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर, UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने नागरिकांना त्यांचे आधार सुरक्षित ठेवण्यासाठी 5 मोलाचे सल्ले दिले आहेत.

तुमचे आधार सुरक्षित ठेवण्यासाठी या 5 गोष्टी करा 

ओटीपी (OTP) कधीही शेअर करू नका: 

तुमच्या आधारचा वापर करून कोणताही व्यवहार किंवा बदल करण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी येतो. हा ओटीपी म्हणजे तुमच्या सुरक्षिततेची चावी आहे. तो कोणालाही, अगदी बँकेचा प्रतिनिधी सांगणाऱ्यालाही देऊ नका.

'मास्क आधार'चा (Masked Aadhaar) वापर करा: 

हॉटेल चेक-इन किंवा इतर ठिकाणी ओळखपत्र देताना नेहमी 'मास्क आधार' वापरा. यामध्ये तुमच्या आधारचे पूर्ण 12 अंक दिसत नाहीत, तर केवळ शेवटचे 4 अंक दिसतात. हे कार्ड तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता.

बायोमेट्रिक्स लॉक करा: 

तुमचे ठसे (फिंगरप्रिंट), डोळ्यांची बाहुली (आयरीस) आणि चेहऱ्याची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी 'बायोमेट्रिक्स लॉक' वैशिष्ट्याचा वापर करा. यामुळे तुमच्या संमतीशिवाय कोणीही बायोमेट्रिक पडताळणी करू शकणार नाही. 'm-Aadhaar' अ‍ॅपद्वारे तुम्ही हे सहज करू शकता.

हेही वाचा – Year Ender 2025: iPhone Air ते Nothing Headphone; 2025 च्या 'मोस्ट स्टायलिश' गॅजेट्सवर एक नजर

सोशल मीडियावर माहिती पोस्ट करू नका: 

अनेकांना आधार कार्ड मिळाल्यावर किंवा अपडेट केल्यावर त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची सवय असते. ही माहिती सार्वजनिक करणे म्हणजे सायबर गुन्हेगारांना निमंत्रण देणे होय. आपला आधार क्रमांक कधीही ऑनलाइन शेअर करू नका.

हेल्पलाईन नंबर लक्षात ठेवा: 

जर तुमची फसवणूक झाली असेल किंवा आधारचा गैरवापर झाल्याचा संशय असेल, तर तातडीने 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईनवर संपर्क साधा. तसेच आधारशी संबंधित तक्रारींसाठी 1947 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा help@uidai.gov.in वर ईमेल करू शकता.

हेही वाचा – India Digital Hub: डिजिटल क्रांतीतून लाखो नोकऱ्यांची संधी; 'डेटा सिटीज' ठरणार भारतीय अर्थव्यवस्थेचा नवा कणा

UIDAI चा इशारा

UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवरून स्पष्ट केले आहे की, आधार हे सेवांचे प्रवेशद्वार आहे आणि त्याची सुरक्षितता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तुमचा आधार, तुमची ओळख; सुरक्षित ठेवा, असा संदेश प्राधिकरणाने दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number