F-16 Fighter Jet Crashes: अवघ्या 6 मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं! उड्डाणानंतर लगेचच कोसळलं ‘एफ-16’ फायटर जेट; वैमानिक..

बालिकेसिर येथील 9 व्या 'मेन जेट बेस कमांड'वरून मंगळवारी रात्री या विमानाने नियमित सरावासाठी झेप घेतली होती. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या 6 मिनिटांत..

F-16 Fighter Jet Crashes: अवघ्या 6 मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं! उड्डाणानंतर लगेचच कोसळलं ‘एफ-16’ फायटर जेट; वैमानिक..

Turkey F-16 Fighter Jet Crashes: तुर्की हवाई दलासाठी मंगळवारची मध्यरात्र काळरात्र ठरली. बालिकेसिर प्रांतात नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण केलेले एक अमेरिकन बनावटीचे एफ-16 (F-16) लढाऊ विमान उड्डाणानंतर अवघ्या 6 मिनिटांत कोसळले. या भीषण अपघातात विमानातील वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला असून, तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने या दुर्दैवी घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानकडेही हीच लढाऊ विमाने आहेत, जी ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताविरोधात वापरण्यात आली होती. त्या वेळी, भारताने पाकिस्तानची काही विमाने पाडलीही होती.

6 मिनिटांत काळाची झेप
बालिकेसिर येथील 9 व्या ‘मेन जेट बेस कमांड’वरून मंगळवारी रात्री स्थानिक वेळेनुसार सुमारे 00:50 वाजता या विमानाने नियमित सरावासाठी झेप घेतली होती. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत म्हणजेच 00:56 वाजता विमानाचा रडार आणि नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क अचानक तुटला. विमान रडारवरून गायब होताच हवाई दलात खळबळ उडाली आणि तातडीने शोध मोहीम हाती घेण्यात आली. अपघातग्रस्त भागातील इस्तंबूल-इझमीर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी वळवण्यात आली होती.

हेही वाचा – Trump Tariff : ट्रेड डीलनंतरही ट्रम्पच्या कुरापती सुरूच! ‘या’ भारतीय कंपन्यांवर 125 टक्के टॅरिफ; का तर म्हणे, ‘आमच्या उत्पादनांना भारतात…’

महामार्गाजवळ आढळले अवशेष
शोध पथकाने काही वेळातच इस्तंबूल-इझमीर महामार्गाजवळील कारेसी (Karesi) परिसरात विमानाचे अवशेष शोधून काढले. विमानाचे अवशेष कित्येक किलोमीटर परिसरात विखुरले गेले होते. दुर्दैवाने, या शोध मोहिमेदरम्यान वैमानिकाचा मृतदेहही सापडला. मेजर इब्राहिम बोलात (Major Ibrahim Bolat) असे या शहीद वैमानिकाचे नाव असल्याचे समोर आले आहे. बालिकेसिरचे गव्हर्नर इस्माइल उस्ताओग्लू यांनी सोशल मीडियावरून वैमानिकाच्या बलिदानाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना ‘वीरमरण’ आल्याचे म्हटले. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन आणि संरक्षण मंत्र्यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. “आमच्या एका शूर योद्ध्याने देशाच्या सेवेत बलिदान दिले आहे, ही देशासाठी मोठी हानी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती
एफ-16 विमाने ही तुर्कीच्या हवाई संरक्षणाचा कणा मानली जातात; त्यामुळे हा अपघात तुर्कीसाठी मोठा धक्का आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने तांत्रिक तज्ज्ञांची एक विशेष टीम तयार केली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता की हवामानातील बदलामुळे हा अपघात घडला, याचा सखोल तपास सुरू आहे. तसेच, विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ शोधण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, बालिकेसिर रिपब्लिकन अभियोक्त्याने (Prosecutor) न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – Imran Khan : पाकिस्तानात खळबळ! इमरान खान मध्यरात्री अचानक रुग्णालयात दाखल; त्यांना तीन इंजेक्शन…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number