Donald Trump on Hamas: ‘3 ते 4 दिवसांत शांतता करार स्वीकारा अन्यथा…’; ट्रम्प यांचा हमासला इशारा

या योजनेमध्ये युद्धबंदी, 72 तासांत हमासकडून सर्व बंदीस्थ वैद्यकीय व नागरी व्यक्ती मुक्त करणे, हमासचे शस्त्रनिरस्त्रीकरण आणि इस्राइलकडून गाझामधून हळूहळू माघार यांचा समावेश आहे.

Donald Trump on Hamas: ‘3 ते 4 दिवसांत शांतता करार स्वीकारा अन्यथा…’; ट्रम्प यांचा हमासला इशारा

Donald Trump on Hamas: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला कडक शब्दांत गंभीर इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी सांगितले आहे की, हमासकडे त्यांच्या 20 कलमी शांतता प्रस्तावाला प्रतिसाद देण्यासाठी फक्त तीन ते चार दिवस आहेत. या योजनेमध्ये युद्धबंदी, 72 तासांत हमासकडून सर्व बंदीस्थ वैद्यकीय व नागरी व्यक्ती (ओलिस) मुक्त करणे, हमासचे शस्त्रनिरस्त्रीकरण आणि इस्राइलकडून गाझामधून हळूहळू माघार यांचा समावेश आहे. तथापी, ट्रम्प यांनी युद्धानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली एक अंतरिम प्रशासन स्थापन केले जाईल, असंही नमूद केलं आहे. 

अन्यथा दुःखद परिणाम भोगावे लागणार – ट्रम्प 

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, 'इतर सर्व संबंधित पक्षांनी योजनेला मान्यता दिली असून आता फक्त हमासची मोर्चेबंदी बाकी आहे. अरब देश तयार आहेत, मुस्लिम देश तयार आहेत आणि इस्रायलही तयार आहे. आता चेंडू हमासच्या कोर्टात आहे. जर ते सहमत झाले नाहीत तर त्याचे परिणाम खूप दुःखद असू शकतील.' या दरम्यान एका पॅलेस्टिनी सूत्राने म्हटले की, हमास आपल्या राजकीय व लष्करी नेत्यांसोबत अंतर्गत व बाह्य बैठका घेत आहे. तथापी, हा विचारविनिमय अनेक दिवस चालू राहू शकतो, कारण हा निर्णय अत्यंत गुंतागुंतीचा आहे.

हेही वाचा – Donald Trump Soyabean Tariff : टॅरिफ वाढवल्याने अमेरिकेला सोयाबिनसाठी खरेदीदार मिळेना; अडचणी वाढल्या

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्पच्या योजनेला पाठिंबा दर्शविला आणि म्हटले की, 'ही योजनेची रूपरेषा आमच्या युद्धकालीन उद्दिष्टाशी जुळते. परंतु जर हमासने ते नाकारले किंवा नंतर तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर इस्रायल आवश्यक ती कारवाई करेल.' 

हेही वाचा – India-EFTA Trade Deal: भारत-ईएफटीए मुक्त व्यापार करार 1 ऑक्टोबरपासून लागू होणार; भारताला काय फायदा होणार? जाणून घ्या

ट्रम्पच्या योजनेला जागतिक पाठिंबा

ट्रम्पने सुचवलेल्या 20 कलमी योजनेचे स्वागत अनेक देशांनी केले आहे. जॉर्डन, कतार, संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया आणि इजिप्त यांचे परराष्ट्र मंत्री या योजनेच्या स्वीकाराप्रति सकारात्मक आहेत. ट्रम्प यांनी युद्ध त्वरित थांबवण्यासाठी व गाझामधील नागरिकांना त्वरित मदत पोहोचवण्यासाठी ही योजना मांडली आहे. परंतु आता हमास तीन-चार दिवसांत या प्रस्तावाला मान्यता देईल की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number