Donald Trump Iran Warning: ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी; बंदुकीसह फोटो पोस्ट करत म्हणाले, ‘आता आणखी सभ्य राहणार नाही..’

ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर स्वतःचा हातात 'असाल्ट रायफल' घेतलेला एक फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी No more Mr. Nice Guy (आता आणखी मवाळपणा नाही) असे कॅप्शन दिले आहे.

Donald Trump Iran Warning: ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी; बंदुकीसह फोटो पोस्ट करत म्हणाले, ‘आता आणखी सभ्य राहणार नाही..’

Donald Trump Iran Warning: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कडक इशारा दिला असून, इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत तातडीने राजनैतिक तोडगा न निघाल्यास अमेरिका लष्करी किंवा आर्थिक पातळीवर कठोर पावले उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) या प्लॅटफॉर्मवर स्वतःचा हातात ‘असाल्ट रायफल’ घेतलेला एक फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी “No more Mr. Nice Guy” (आता आणखी मवाळपणा नाही) असे कॅप्शन दिले आहे. “अणुनिःशस्त्रीकरणाच्या करारावर स्वाक्षरी कशी करायची, हेच त्यांना माहीत नाही,” अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वावर टीका केली आहे.

अणुप्रश्नावरून तणाव शिगेला; वाटाघाटींची कोंडी
ट्रम्प यांनी ही विधाने अशा वेळी केली आहेत जेव्हा मध्य-पूर्व आशियातील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणच्या अटी वॉशिंग्टनला मान्य नसल्याने राजनैतिक पातळीवर मोठी कोंडी निर्माण झाली आहे. जोपर्यंत अणुप्रश्न थेटपणे सोडवला जात नाही आणि इराण अण्वस्त्र निर्मिती थांबवण्याचे ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत अमेरिका कोणत्याही चर्चेत रस दाखवणार नाही, यावर ट्रम्प यांनी भर दिला आहे. ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे या प्रदेशात युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत.

इराणचा प्रस्ताव नाकारला; अण्वस्त्रबंदीवर अमेरिका ठाम
इराणने अलीकडेच ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्याचा आणि शत्रुत्व संपवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले आहे की, केवळ मार्ग खुला करणे पुरेसे नाही. कोणताही अंतिम करार असा असावा, ज्यामुळे इराणला अण्वस्त्रे विकसित करण्यापासून कायमस्वरूपी रोखता येईल. “इराणकडे अण्वस्त्रे असणे म्हणजे संपूर्ण जगाला ओलीस धरण्यासारखे आहे,” असा इशारा ट्रम्प यांनी यापूर्वीच दिला आहे, त्यामुळे केवळ वरवरच्या प्रस्तावावर अमेरिका समाधानी नाही.

हेही वाचा – Donald Trump: ‘इराणकडे अण्वस्त्रं आली तर जग धोक्यात येईल’; डोनाल्ड ट्रम्प यांनी जर्मनीला सुनावलं; सोशल मीडियावरील पोस्टने वाढवला आंतरराष्ट्रीय तणाव

इराणच्या नाकेबंदीसाठी ट्रम्प यांचा ‘मास्टर प्लॅन’ सज्ज
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी आपल्या टीमला इराणची दीर्घकालीन नाकेबंदी करण्याच्या योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या रणनीतीचे मुख्य उद्दिष्ट इराणच्या बंदरांकडे जाणारा सागरी मार्ग कडकपणे नियंत्रित करणे आणि त्यांची तेल निर्यात ठप्प करून अर्थव्यवस्था मोडकळीस आणणे हे आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, थेट हवाई हल्ले करण्याऐवजी ही आर्थिक आणि सागरी नाकेबंदी अधिक प्रभावी आणि कमी जोखीम असलेला पर्याय असल्याचे ट्रम्प यांना वाटते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number