Anunay Sood Death: फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 स्टार्समधील ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूद यांचे निधन; 32 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

अनुनयच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले आहे की, 'आमच्या लाडक्या अनुनय सूद यांच्या निधनाची बातमी शेअर करताना आम्हाला खूप दुःख होत आहे.'

Anunay Sood Death: फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 स्टार्समधील ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूद यांचे निधन; 32 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Anunay Sood Death: दुबईस्थित प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर आणि फोटोग्राफर अनुनय सूद (Anunay Sood) यांचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये आणि इन्फ्लुएंसर समुदायात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड करण्यात आलेले नाही. अनुनयच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले आहे की, 'आमच्या लाडक्या अनुनय सूद यांच्या निधनाची बातमी शेअर करताना आम्हाला खूप दुःख होत आहे. या कठीण काळात तुमची समजूतदारपणा आणि गोपनीयतेची आम्ही विनंती करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.' कुटुंबाने चाहत्यांना खाजगी मालमत्तेजवळ जमाव टाळण्याचे आवाहन केले आहे.

अनुनयची शेवटची पोस्ट

अनुनयची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट लास वेगासमधील होती. बुधवारी त्यांनी एका कार ब्रँड इव्हेंटमधील काही फोटो शेअर करत कॅप्शन दिलं होतं, 'मला अजूनही विश्वास बसत नाही की मी माझा वीकेंड दिग्गज आणि स्वप्नातील मशीन्समध्ये घालवला. तुम्हाला कोणत्या ट्रिपवर जायला आवडेल?' त्याची ही पोस्ट त्यांच्या चाहत्यांसाठी शेवटची ठरली.

हेही वाचा – Actor Harish Rai : ‘केजीएफ’मधील 'या' अभिनेत्याचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

प्रवासातून नाव कमावलेला इन्फ्लुएंसर

अनुनय सूद हे एक लोकप्रिय ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर, फोटोग्राफर आणि YouTuber होते. इंस्टाग्रामवर त्यांचे 1.4 दशलक्ष फॉलोअर्स, आणि YouTube वर 3.8 दशलक्ष सबस्क्राइबर्स होते. त्यांच्या अनोख्या प्रवासाच्या फोटोंनी आणि व्हिडिओंनी जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

हेही वाचा – Salman Khan Court Notice: सलमान खान अडचणीत, जाहिरात करणं नडलं ; न्यायालयाने बजावली नोटीस

फोर्ब्स इंडियामध्ये सलग तीन वर्षांचा गौरव

अनुनय सूद यांचा फोर्ब्स इंडियाच्या 'टॉप 100 डिजिटल स्टार्स' यादीत सलग तीन वर्षे (2022, 2023, 2024) समावेश होता.  ही त्यांच्या लोकप्रियतेची आणि यशाची साक्ष आहे. अनुनयच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number