Gen Z Gold Investment: सोने खरेदीचा पारंपरिक ट्रेंड बदलणार; ‘या’ गुंतवणूकीच्या पर्यायाकडे वाढतोय ‘जेन झी’चा कल

भारतीय घरांमध्ये पडून असलेल्या तब्बल 31,000 टन (ज्याचे मूल्य सुमारे 315 लाख कोटी रुपये आहे) सोन्याला औपचारिक वित्तीय प्रणालीत आणण्याची मोठी संधी या पिढीमुळे निर्माण झाली आहे.

Gen Z Gold Investment: सोने खरेदीचा पारंपरिक ट्रेंड बदलणार; ‘या’ गुंतवणूकीच्या पर्यायाकडे वाढतोय ‘जेन झी’चा कल

Gen Z Gold Investment: भारतातील सोन्याची बाजारपेठ आगामी काळात एका नव्या डिजिटल वळणावर जाण्याचे संकेत मिळत आहेत. 'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल'च्या (WGC) ‘गोल्डन फ्लाईट 2047’ या ताज्या अहवालानुसार, देशातील तरुण पिढी म्हणजेच 'जनरेशन झेड' (Gen Z – 1997 ते 2021 दरम्यान जन्मलेले) सोन्याकडे केवळ पारंपरिक दागिने किंवा कौटुंबिक ठेवा म्हणून न पाहता एक आधुनिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहत आहे. भारतीय घरांमध्ये पडून असलेल्या तब्बल 31,000 टन (ज्याचे मूल्य सुमारे 315 लाख कोटी रुपये आहे) सोन्याला औपचारिक वित्तीय प्रणालीत आणण्याची मोठी संधी या पिढीमुळे निर्माण झाली आहे. या तरुणांचा भर प्रत्यक्ष दुकानात जाण्याऐवजी मोबाईलद्वारे ‘डिजिटल गोल्ड’ आणि ऑनलाईन गुंतवणुकीवर अधिक दिसून येत आहे.

2035 पर्यंत तरुणांची खर्च क्षमता 2 ट्रिलियन डॉलर होणार; सुवर्ण मुद्रीकरणाला मिळणार गती

तरुण पिढीसाठी सोने खरेदीतील पारदर्शकता, जलद रोख रकमेत रूपांतर करण्याची सोय (Liquidity) आणि गरजेनुसार अल्प प्रमाणात खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. WGC च्या अंदाजानुसार, 2035 पर्यंत 'जेन झी'ची एकूण खर्च करण्याची क्षमता 2 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल. जर या पिढीच्या माध्यमातून घरगुती सोन्याचा लहान भाग जरी सुवर्ण मुद्रीकरण (Gold Monetisation), इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स (EGR) आणि बुलियन बँकिंगद्वारे बाजारात आणला गेला, तर देशाची परदेशी सोन्यावरील आयातीची निर्भरता कमी होईल. यामुळे भांडवल उभारणीस मदत होऊन देशांतर्गत निधीची उपलब्धता वाढेल.

हेही वाचा – Government Scheme : गर्भवती महिलांना केंद्र सरकारची मोठी भेट! मिळणार 5,000 ते 6,000 रुपयांची आर्थिक मदत; अर्ज कसा करावा?

भारतीय सोन्याची बाजारपेठ आणि भविष्यातील 5 प्रमुख सुधारणा

सध्या भारतातील दागिन्यांची बाजारपेठ सुमारे 4.5 लाख कोटी रुपयांची आहे. सोन्याचा योग्य आर्थिक वापर करण्यासाठी आणि बाजारपेठ बळकट करण्यासाठी वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने पुढील पाच महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत:

घरगुती सोन्याचे आर्थिक भांडवलात रूपांतर: तिजोरीत पडून असलेले सोने गुंतवणुकीच्या प्रवाहात आणणे.

देशांतर्गत खाणकामावर भर: भारताच्या एकूण सोन्याच्या गरजेपैकी 10 ते 15 टक्के पुरवठा देशांतर्गत खाणींतून करणे.

जागतिक निर्यातीत आघाडी: भारताला जगातील अव्वल क्रमांकाचा सोन्याचे दागिने निर्यातदार देश बनवणे.

तरुणांच्या पसंतीनुसार डिझाईन्स: नव्या पिढीच्या बदलत्या आवडीनुसार हलक्या आणि आधुनिक दागिन्यांची निर्मिती करणे.

राष्ट्रीय संपत्ती म्हणून मान्यता: सोन्याला केवळ वैयक्तिक संचय न मानता देशाच्या आर्थिक ताकदीचा भाग बनवणे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number