Higher Returns Than FD: निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरळीत व आनंदी ठेवण्यासाठी आर्थिक नियोजनाची योग्य साधने निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याच जणांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा सोन्यात गुंतवणुकीची जोखीम पत्करायची नसते. त्यामुळे ते बँक फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) सारख्या सुरक्षित पर्यायांना प्राधान्य देतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का? काही सरकारी योजना अशा आहेत ज्या एफडीपेक्षा जास्त परतावा देतात आणि पूर्णपणे सुरक्षित आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा 3 सरकारी योजनांबद्दल माहिती देत आहोत ज्या उच्च परतावा, करसवलत आणि शून्य जोखीम देतात.
1. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)
भारत सरकारची अत्यंत विश्वासार्ह अशी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना 5 वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे. ही निश्चित उत्पन्न देणारी गुंतवणूक योजना आहे.
व्याजदर: 7.7 टक्के
परिपक्वता कालावधी: 5 वर्षे
किमान गुंतवणूक: 1000
जोखीम: शून्य
कर लाभ: कलम 80C अंतर्गत सूट
कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसमधून सहजपणे NSC खरेदी करू शकतो. सुरक्षित आणि चांगला परतावा हवी असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय.
2. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
दीर्घकालीन बचतीसाठी आणि निवृत्ती नियोजनासाठी सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणजे PPF.
व्याजदर: 7.10 टक्के
कालावधी: 15 वर्षे (वाढवता येऊ शकतो)
किमान गुंतवणूक: 500
कमाल गुंतवणूक: 1.5 लाख प्रतिवर्ष
कर सवलत: कलम 80C अंतर्गत पूर्ण सूट
PPF मध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि दीर्घ मुदतीत मोठी रक्कम जमा होते.
हेही वाचा – USD vs INR: भारतीय रुपया चार दशकांत सर्वात कमकुवत; डॉलरच्या तुलनेत गाठली विक्रमी नीचांकी पातळी
3. सुकन्या समृद्धि योजना (SSY)
मुलींच्या शिक्षण व भविष्य नियोजनासाठी सरकारची सर्वोत्तम आणि सर्वाधिक परतावा देणारी योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना.
व्याजदर: 8.20 टक्के
किमान गुंतवणूक: 250
कमाल गुंतवणूक: 1.5 लाख प्रतिवर्ष
कर सवलत: कलम 80C
उद्दिष्ट: मुलीचे शिक्षण व लग्न खर्च
सुकन्या योजनेत गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन सुरक्षित बचत तयार होते आणि मुलीच्या भविष्याची आर्थिक हमी मिळते.
जर तुम्ही जोखमीपासून दूर राहून सुरक्षित पण उच्च परताव्याच्या गुंतवणुकीचा शोध घेत असाल, तर NSC, PPF, सुकन्या समृद्धि योजना या तीन सरकारी योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. एफडीपेक्षा अधिक व्याजदर, करसवलत आणि सरकारी हमी यामुळे या योजना गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहेत. आपल्या गरजेनुसार या योजनांचा अवलंब करून तुम्ही निवृत्तीचे जीवन अधिक स्थिर, सुरक्षित आणि आरामदायी बनवू शकता.