Sonam Wangchuk: ‘…तर मी भूत बनून परत येईन’; उपोषणाच्या 20 व्या दिवशी सोनम वांगचुक यांचा सरकारला इशारा

गेल्या 20 दिवसांपासून उपोषणावर बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

Sonam Wangchuk: ‘…तर मी भूत बनून परत येईन’; उपोषणाच्या 20 व्या दिवशी सोनम वांगचुक यांचा सरकारला इशारा

Sonam Wangchuk: गेल्या 20 दिवसांपासून उपोषणावर बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अत्यंत हलक्या-फुलक्या पण तितक्याच ठाम अंदाजात, ‘मी कोणत्याही परिस्थितीत 20 जुलैपर्यंत जिवंत राहीन,’ असं म्हटले आहे. 

संसदेवर काढण्यात येणाऱ्या नियोजित मोर्चाचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, “20 जुलैपर्यंत जिवंत राहून मला तुम्हा सर्वांसोबत संसदेकडे मोर्चा काढायचा आहे. पण जर आपला हा मोर्चा यशस्वी झाला नाही, तर मात्र मी भूत बनून परत येईन.” दरम्यान, वांगचुक यांच्या या आंदोलनाला विरोधकांकडून मोठा पाठिंबा मिळत असून, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आज दिल्लीतील जंतर-मंतर येथे जाऊन त्यांची भेट घेतली. वांगचुक आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’चे सदस्य सध्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा –  Aamir Khan: नेटकऱ्यांच्या टीकेनंतर अखेर आमिर खानने सोडलं मौन; ‘चतुर’चा व्हिडीओ चुकीचा, ‘रँचो’ हे पात्र सोनम वांगचूक यांच्यावर…

वांगचुक यांच्या प्रकृतीची चिंता; वजनात सतत घट

सतत 20 दिवसांच्या उपोषशामुळे सोनम वांगचुक यांच्या शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होत असून त्यांचे वजन झपाट्याने कमी होत आहे. डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर चोवीस तास लक्ष ठेवून आहे. वांगचुक यांची तपासणी केल्यानंतर डॉ. सतीश लांबा यांनी सांगितले की, “उपोषणाचा आज 20 वा दिवस असून त्यांचे वजन 56.55 किलोवर आले आहे. गेल्या 24 तासांत त्यांच्या वजनात 350 ग्रॅमची घट झाली आहे. त्यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण सध्या पुरेसे असले, तरीही काही प्रमाणात डिहायड्रेशन जाणवू लागले आहे.” यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना अवयव निकामी होण्याचा धोका असल्याचा इशाराही दिला आहे. या अत्यंत खालावलेल्या प्रकृतीतही वांगचुक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number