2025 Plane Crash : 2025 मध्ये भयंकर विमान अपघातांनी जग हादरलं, मात्र ‘या’ दुर्घटनेत मोठी जीवीतहानी

नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) नुसार, एकट्या अमेरिकेत किमान 623 अपघातांची नोंद झाली, ज्यापैकी 60 पेक्षा जास्त अपघात प्राणघातक ठरले.

2025 Plane Crash : 2025 मध्ये भयंकर विमान अपघातांनी जग हादरलं, मात्र ‘या’ दुर्घटनेत मोठी जीवीतहानी

Year Ender 2025: यंदाचं 2025 हे वर्ष जागतिक नागरी विमान वाहतूक इतिहासात अत्यंत दुर्दैवी वर्ष म्हणून नोंदवले गेले आहे. तांत्रिक बिघाड, मानवी चुका आणि निसर्गाचा प्रकोप अशा विविध कारणांमुळे या वर्षात जवळपास एक डझन मोठे विमान अपघात झाले. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) नुसार, एकट्या अमेरिकेत किमान 623 अपघातांची नोंद झाली, ज्यापैकी 60 पेक्षा जास्त अपघात प्राणघातक ठरले. व्यावसायिक आणि खाजगी विमानांच्या अपघातांचे हे वाढते प्रमाण जागतिक स्तरावर चिंतेचा विषय ठरले आहे.

अमेरिकेतील सर्वात मोठा विमान अपघात 

वर्षाची रक्तरंजित सुरुवात 2025 ची सुरुवातच अपघातांच्या मालिकेने झाली. 28 जानेवारी रोजी दक्षिण कोरियात एअर बुसान फ्लाइट 391 ला उड्डाणापूर्वी आग लागली, ज्यात 176 प्रवासी थोडक्यात बचावले असले तरी 27 जण जखमी झाले. मात्र, 29 जानेवारीचा दिवस अधिक काळवंडलेला ठरला. दक्षिण सुदानमध्ये बीचक्राफ्ट 1900 विमान कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी अमेरिकेत अमेरिकन ईगल फ्लाइट 5342 आणि लष्करी हेलिकॉप्टरची हवेत धडक होऊन 67 जणांना प्राण गमवावे लागले. अमेरिकेतील या वर्षातील हा सर्वात मोठा हवाई अपघात ठरला.

हेही वाचा – CBI Arrested Lt Col Deepak Kumar Sharma: लेफ्टनंट कर्नलच्या घरावर सीबीआयचा छापा; 2.23 कोटींची रोकड जप्त आणि पत्नीवरही कारवाई

अपघातांचे सत्र अखंड जानेवारीतील घटनांनंतर फेब्रुवारीमध्येही बेरिंग एअर फ्लाइट 445 कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. 17 फेब्रुवारी रोजी टोरंटो येथे डेल्टा कनेक्शन फ्लाइट 4819 लँडिंगदरम्यान कोसळले, ज्यात 21 प्रवासी जखमी झाले. मार्चमध्ये होंडुरासमध्ये एरोलिनिया लानहासा फ्लाइट 018 समुद्रात कोसळून 13 जणांचा बळी गेला. एप्रिलमध्ये अपहरण आणि आपत्कालीन लँडिंगच्या घटनांनी प्रवाशांमध्ये घबराट पसरवली होती.

अहमदाबाद दुर्घटना

दरम्यान, 2025 मधील जगातील सर्वात मोठा विमान अपघात 12 जून 2025 रोजी भारताच्या मातीवर झाला. एअर इंडियाचे फ्लाइट 171 (बोईंग 787-8 ड्रीमलाइनर) अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या एका मिनिटात वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर आदळले. या भयानक दुर्घटनेत विमानातील 241 आणि इमारतीतील 19 असे एकूण 260 लोक मृत्युमुखी पडले. बोईंग 787 विमानाचा हा इतिहासातील पहिलाच प्राणघातक अपघात ठरला, ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले.

वर्षाच्या उत्तरार्धातील जागतिक दुर्घटना 

जुलैमध्ये रशियात अंगारा एअरलाइन्सचे विमान डोंगरावर कोसळून 48 जणांचा मृत्यू झाला. ऑक्टोबरमध्ये हाँगकाँगमध्ये एमिरेट्स स्कायकार्गोचे विमान धावपट्टीवर वाहनाला धडकले, तर केनियामध्ये सेस्ना विमानाचा अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. नोव्हेंबरमध्ये UPS एअरलाइन्सच्या अपघातात 14 जणांना जीव गमवावा लागला. वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये युनायटेड एअरलाइन्सच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, मात्र नशिबाने 290 प्रवाशांचे प्राण वाचले. 2025 मध्ये एकूण 94 मोठे अपघात झाले असून मृतांचा आकडा शेकडोमध्ये आहे.

हेही वाचा – Railway Fare Hike: रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का! 26 डिसेंबरपासून तिकिट दरात वाढ, प्रवास महागणार

जगाच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक अपघात 

इतिहासातील सर्वात भीषण विमान अपघात 2025 मधील अहमदाबाद दुर्घटनेने जखमा ओल्या केल्या असल्या, तरी जगाच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक अपघात 27 मार्च 1977 रोजी स्पेनच्या टेनेरिफ विमानतळावर झाला होता. दोन बोईंग 747 जंबो जेट्सची धावपट्टीवरच टक्कर होऊन 583 लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर 1985 मध्ये जपान एअरलाइन्सच्या अपघातात 520 जणांचा मृत्यू झाला होता, जो इतिहासातील दुसरा सर्वात मोठा अपघात मानला जातो.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number