NEET UG Counseling : NEET-UG विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! समुपदेशनाच्या तारखा जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

पहिल्या फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 22 ऑगस्टपर्यंत आपापल्या महाविद्यालयांत नावनोंदणी पूर्ण करावी लागेल.<br/>

NEET UG Counseling : NEET-UG विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! समुपदेशनाच्या तारखा जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

NEET UG Counseling:  देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये (MBBS सह इतर) प्रवेश घेण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. मेडिकल समुपदेशन समितीने (MCC) सत्र 2026-27 साठी ऑल इंडिया आणि राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेची घोषणा केली आहे. या वेळापत्रकानुसार, केंद्रीय आणि डीम्ड विद्यापीठांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्टपासून सुरु होऊन 17 ऑगस्टपर्यंत चालेल. पहिल्या फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 22 ऑगस्टपर्यंत आपापल्या महाविद्यालयांत नावनोंदणी पूर्ण करावी लागेल.

त्यानंतर लगेचच, 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान दुसरी तर 10 ते 18 सप्टेंबर दरम्यान तिसरी फेरी पार पडणार आहे. शेवटच्या टप्प्यातील रिकाम्या जागा भरण्यासाठीची 'स्ट्रे व्हॅकन्सी' फेरी 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली असून, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया 10 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्य कोट्यातील प्रवेश वेळापत्रक आणि सत्राची सुरुवात

राज्य कोट्यातील जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया 13 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिली फेरी 22 ऑगस्टला संपेल आणि विद्यार्थ्यांना 28 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल. राज्य कोट्याची दुसरी फेरी 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर, तिसरी फेरी 16 ते 26 सप्टेंबर आणि अखेरची 'स्ट्रे व्हॅकन्सी' फेरी 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होईल.

विशेष म्हणजे, प्रवेशाच्या उर्वरित फेऱ्या सुरू असतानाच नवीन शैक्षणिक वर्षाचे वर्ग 8 सप्टेंबरपासून अधिकृतपणे सुरू होतील. ही संपूर्ण प्रक्रिया दिलेल्या मुदतीत सुरळीत पार पाडण्यासाठी शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही समुपदेशनाचे काम नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश सर्व प्राधिकरणांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा – Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मिळाला आणखी वेळ

डिजिटल सुलभतेवर भर: यंदा प्रक्रियेत पारदर्शक बदल

विद्यार्थ्यांचा त्रास वाचवण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी MCC ने प्रवेश नियमांमध्ये महत्त्वाचे सुधारणात्मक बदल केले आहेत:

प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नाही: ज्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या जागेत 'अपग्रेडेशन'चा पर्याय निवडला आहे, त्यांना कागदोपत्री सोपस्कारांसाठी महाविद्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. त्यांची जागा आपोआप सुरक्षित राहील.

ऑनलाइन राजीनामा सोय: एखाद्या विद्यार्थ्याला मिळालेली जागा सोडायची असल्यास, तो थेट MCC च्या संकेतस्थळावरूनच नियमानुसार ऑनलाइन राजीनामा देऊ शकेल.

NRI कोट्यासाठी डिजिटल पडताळणी: डीम्ड विद्यापीठांमध्ये एनआरआय कोट्यातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता आपली महत्त्वाची कागदपत्रे पोर्टलवरच अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number