The Family Man 3 Trailer: प्रेक्षकांच्या सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘द फॅमिली मॅन सीझन 3’चा दमदार ट्रेलर अखेर रिलीज झाला असून पुन्हा एकदा मनोज बाजपेयी उर्फ श्रीकांत तिवारी परतला आहे. हेरगिरी, थरार, कौटुंबिक संघर्ष आणि रोमांचाने भरलेला हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या वेळी कथा आणखी गूढ आणि धोकादायक झाली आहे. श्रीकांत तिवारीला या सीझनमध्ये रुक्मा (जयदीप अहलावत) आणि मीरा (निम्रत कौर) या नव्या शत्रूंचा सामना करावा लागतो. आपल्या कुटुंबासह पळून जाणारा श्रीकांत एकीकडे देशाचे रक्षण करण्यासाठी धडपडतो, तर दुसरीकडे स्वतःच्या जगण्याची लढाई लढतो.
हेही वाचा – Katrina-Vicky Kaushal Blessed with Baby Boy : आनंदाची बातमी ! कतरिना-विकीच्या घरी तान्हुल्याचे आगमन
राज आणि डीके यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये हाय-ऑक्टेन अॅक्शन, विनोदी संवाद आणि श्रीकांतच्या वैयक्तिक संघर्षाचा भावनिक प्रवास दाखवला आहे. 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्राइम व्हिडिओवर हा सीझन प्रदर्शित होणार आहे. सीझन 3 मध्ये शरीब हाश्मी, प्रियामणी, आश्लेषा ठाकूर, वेदांत सिन्हा, श्रेया धनवंतरी, गुल पनाग यांसह नवे चेहरे जयदीप अहलावत आणि निम्रत कौर दमदार भूमिका साकारत आहेत.
मनोज बाजपेयी यांनी सांगितले, चार वर्षांपासून चाहते विचारत होते श्रीकांत तिवारी पुन्हा कधी येणार? अखेर तो क्षण आला आहे. हा सीझन पूर्वीपेक्षा मोठा, अधिक तगडा आणि थरारक असेल. तथापी, दिग्दर्शक राज आणि डीके म्हणाले, या सीझनमध्ये श्रीकांतचे आयुष्य पूर्णपणे बदलते. तो एकाच वेळी पती, वडील आणि देशाचा रक्षक म्हणून धावतो. याशिवाय, नव्या पात्राविषयी जयदीप अहलावत म्हणाले, फॅमिली मॅनसारख्या प्रतिष्ठित मालिकेचा भाग होणे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. हा सीझन चाहत्यांना नक्कीच रोमांचित करेल.