Thalapathy Vijay Visited Shirdi: निवडणुकीच्या निकालाआधी थलपती विजय साईचरणी; शिर्डीत घेतले साईबाबांचे आशीर्वाद

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर होणार असून, त्याआधी विजय दैवी आशीर्वादासाठी मंदिरांना भेटी देत आहेत.

Thalapathy Vijay Visited Shirdi: निवडणुकीच्या निकालाआधी थलपती विजय साईचरणी; शिर्डीत घेतले साईबाबांचे आशीर्वाद

Thalapathy Vijay Visited Shirdi: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाचे अध्यक्ष ‘थलपती’ विजय सध्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या वळणावर आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर होणार असून, त्याआधी विजय दैवी आशीर्वादासाठी मंदिरांना भेटी देत आहेत. यादरम्यान, बुधवारी विजय यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साईंच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करतानाचा त्यांचा शांत चेहरा अनेकांचे लक्ष वेधून घेत होता.

चाहत्यांची तुफान गर्दी आणि कडेकोट सुरक्षा
शिर्डीत सुपरस्टार विजय येणार असल्याची बातमी समजताच मंदिर परिसरात त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी उत्साही चाहत्यांनी त्यांना गराडा घातला. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात विजय यांनी साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली. राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर विजय यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे, त्यामुळेच निकालाच्या निकालाच्या तणावापासून दूर राहण्यासाठी त्यांनी आध्यात्मिक शांततेचा मार्ग निवडल्याचे दिसून येते.

मुरुगन मंदिरानंतर आता शिर्डी वारी; निकालाकडे सर्वांचे लक्ष
शिर्डीला येण्यापूर्वी मंगळवारी विजय यांनी तामिळनाडूतील प्रसिद्ध तिरुचेंदूर मुरुगन मंदिरालाही भेट दिली होती. चेन्नईहून खासगी विमानाने मदुराईत पोहोचल्यानंतर त्यांनी पारंपरिक वेशभूषेत मुरुगन देवाची पूजा-अर्चा केली. तामिळनाडूच्या राजकीय रणांगणात विजय यांचा ‘टीव्हीके’ पक्ष किती प्रभाव पाडतो, हे 4 मे रोजी स्पष्ट होईल. या निकालांकडे केवळ तामिळनाडूचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा – Shah Rukh Khan Fan: बॉलिवूडच्या ‘किंग खान’ची ऑस्ट्रेलियातही क्रेझ; ऑस्ट्रेलियन मंत्र्यांनी व्यक्त केलं शाहरुखबद्दलचं खास प्रेम; ‘हा’ डायलॉग आहे सर्वात आवडता

‘जन नायकन’ चित्रपटाची प्रतीक्षा आणि प्रदर्शनाची तारीख
राजकीय धावपळीसोबतच विजय यांचा आगामी चित्रपट ‘जन नायकन’ (Jan Nayakan) सध्या चर्चेत आहे. सेन्सॉर बोर्डाच्या वादामुळे जानेवारीत प्रदर्शित होऊ न शकलेला हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 8 मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याच्या अफवा उडाल्या होत्या, मात्र निर्मात्यांनी आता अधिकृत प्रदर्शनासाठी कंबर कसली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number