Plane Crash In America: अमेरिकेतील केंटकी राज्यातील लुईसविले शहरात भीषण विमान अपघात झाला आहे. मोठ्या मालवाहू विमानाचा उड्डाणादरम्यान स्फोट होऊन 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने पुष्टी करताना सांगितले की, अजूनही काही जणांचा शोध सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी सुमारे 5:15 वाजता विमान लुईसविलेतील मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होनोलुलूकडे निघाले होते. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच विमानाच्या डाव्या पंखाला आग लागली आणि ते कोसळले.
ज्वाळा आणि धुराचे लोट
घटनेचे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर समोर आले असून, विमान हवेत असतानाच त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या ज्वाळा आणि दाट धूर दिसत आहे. काही क्षणांनी विमान जमिनीवर कोसळते आणि प्रचंड स्फोट होतो. स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की जवळच्या इमारती हादरल्या आणि अनेक घरांच्या खिडक्या फुटल्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
2.8 लाख गॅलन इंधनाने लागली प्रचंड आग
लुईसविलेचे महापौर क्रेग ग्रीनबर्ग यांनी सांगितले की, विमानात सुमारे 2 लाख 80 हजार गॅलन जेट इंधन होते. त्यामुळे अपघातानंतर आग अत्यंत वेगाने पसरली. आम्ही आमच्या सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करून बचावकार्य सुरू ठेवले आहे, असे ग्रीनबर्ग यांनी स्थानिक चॅनेल WLKY-TV ला सांगितले.
हेही वाचा – भाजीविक्रेत्याचं नशिब पालटलं!; तिकिटासाठी पैसे उसने घेतले अन् जिंकली 11 कोटींची लॉटरी
इंजिन फेल झाल्याची प्राथमिक शक्यता
केंटकी राज्याचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी सांगितले की, टेकऑफनंतर विमानाच्या डाव्या पंखाला आग लागली आणि त्याचे एक इंजिन कोसळले. त्यामुळे विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. तपास पथकाचे प्रमुख टॉड इनमन यांनी सांगितलं की, विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि डेटा रेकॉर्डर सापडले असून, प्राथमिक तपास सुरू आहे.
?#BREAKING: Watch brand new and heart-stopping moment captured on CTV footage as a UPS cargo MD-11 Jet crashes into multiple buildings and bursts into flames shortly after attempting takeoff near Louisville’s Muhammad Ali International Airport. pic.twitter.com/8iEBP2rgCR — R A W S A L E R T S (@rawsalerts) November 5, 2025
हेही वाचा – जगातील 9 सर्वात शक्तिशाली अण्वस्त्रधारी देश; भारताचे स्थान कुठे? जाणून घ्या कोणाकडे किती अण्वस्त्रे
विमानाचे अवशेष परिसरात पसरले
दरम्यान, इनमन यांनी सांगितले की, अपघातानंतर विमानाचे अवशेष जवळपास अर्धा मैल क्षेत्रात पसरले होते. एका स्थानिक कर्मचाऱ्याने सांगितले स्फोट इतका मोठा होता की आम्हाला क्षणभर वाटलं की कुणीतरी हल्ला केला आहे. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) यांच्या पथकांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. अपघाताचे कारण इंजिन बिघाड, इंधनातील तांत्रिक दोष की मानवी चूक याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही.