Tenant Legal Rights : भाडेकरू घर सोडताना मालकाने दुरुस्तीचे पैसे मागणे कायदेशीर असते? जाणून घ्या, डिपॉझिट परत करण्यासंबंधीचे नियम

घर रिकामं करताना डिपॉझिट परत मिळण्यावरून घरमालक आणि भाडेकरू यांच्यात अनेकदा खटके उडतात. भिंतीचा रंग, नळ किंवा फर्निचरची झीज अशी कारणे देऊन मालक पैसे कापण्याच्या प्रयत्नात असतात.

Tenant Legal Rights : भाडेकरू घर सोडताना मालकाने दुरुस्तीचे पैसे मागणे कायदेशीर असते? जाणून घ्या, डिपॉझिट परत करण्यासंबंधीचे नियम

Tenant Legal Rights : शहराच्या ठिकाणी भाड्याने घर राहणे ही अनेकांची अपरिहार्य गरज बनलेली असते. घर शोधणे, घर मिळाल्यानंतर विविध कायदेशीर बाबी यांचा प्रवास अनेकदा कठीण वाटतो. तितकाच तणावपूर्ण अनुभव अनेकदा घर सोडताना येतो. घर रिकामं करताना डिपॉझिट (Security Deposit) परत मिळवण्यावरून घरमालक आणि भाडेकरू यांच्यात अनेकदा खटके उडतात. भिंतीचा रंग, नळ किंवा फर्निचरची झीज अशी कारणे देऊन मालक पैसे कापण्याच्या किंवा कधीकधी संपूर्ण डिपॉझिट परत न देण्याच्या प्रयत्नात असतो. अशा वेळी कायद्याचे नियम काय सांगतात, हे जाणून घेणे दोन्ही पक्षांसाठी गरजेचे आहे.

नैसर्गिक झीज (Normal Wear and Tear) म्हणजे काय?
कायद्यानुसार, भाडेकरूने घर ज्या स्थितीत घेतले होते, त्याच स्थितीत ते परत करणे अपेक्षित असते. मात्र, यात 'नॉर्मल वेअर अँड टेअर' म्हणजेच नैसर्गिक झीज ग्राह्य धरली जाते. दिल्ली उच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे की:
रंगाचा खर्च: काळाच्या ओघात भिंतीचा रंग उडणे किंवा त्यावर सामान्य डाग पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जोपर्यंत भाडेकरारामध्ये (Rent Agreement) स्पष्ट उल्लेख नसेल, तोपर्यंत मालक रंगाच्या कामासाठी भाडेकरूचे पैसे कापू शकत नाही.
नळ आणि फिटिंग्ज: वापरामुळे नळांची किंवा इलेक्ट्रिक स्विचची झालेली नैसर्गिक झीज दुरुस्त करण्याची जबाबदारी घरमालकाची असते.

मालक पैसे कधी कापून घेऊ शकतो?
जर घराचे नुकसान हे नैसर्गिक नसून भाडेकरूच्या निष्काळजीपणामुळे किंवा चुकीच्या वापरामुळे झाले असेल, तरच मालक भरपाईची मागणी करू शकतो. यात खालील बाबींचा समावेश होतो:
स्ट्रक्चरल डॅमेज: घराच्या मूळ रचनेत (भिंती पाडणे किंवा बदलणे) बदल करणे.
तोडफोड: घरातील फर्निचर तुटणे, खिडक्यांच्या काचा फुटणे किंवा महागड्या फिटिंग्ज काढून घेणे.
थकीत देणी: जर भाडेकरूचे भाडे थकले असेल किंवा वीज आणि पाण्याचे बिल भरलेले नसेल, तर मालक डिपॉझिटमधून तितकी रक्कम वळती करू शकतो.

हेही वाचा – Finance Bill 2026: लोकसभेत 'अर्थ विधेयक 2026' मंजूर; करदात्यांना दिलासा देणाऱ्या 32 मोठ्या सुधारणांचा मार्ग मोकळा

भाडेकरूंनी स्वतःचा बचाव कसा करावा?
विनाकारण डिपॉझिट कापले जात असल्यास भाडेकरूंकडे खालील कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, यासाठी रीतसर भाडेकरारपत्र आवश्यक आहे.
फोटो आणि व्हिडिओ पुरावा: घर ताब्यात घेताना आणि सोडताना घराची स्थिती कशी होती, याचे व्हिडिओ डोक्युमेंटेशन करणे हा सर्वात उत्तम पुरावा ठरतो.
भाडेकराराचे वाचन: करारात दुरुस्तीबाबत नेमक्या काय अटी आहेत, हे नीट वाचावे. मालक अवास्तव खर्च लावत असेल, तर त्याला करारानुसार आव्हान देता येते.
पुराव्याची मागणी: नुकसान भाडेकरूमुळेच झाले आहे, हे सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी घरमालकाची असते.

डिपॉझिट रोखून धरण्याबाबत नियम
घरमालक भाडेकरूचे संपूर्ण डिपॉझिट विनाकारण अडवून ठेवू शकत नाही. केवळ प्रत्यक्ष झालेले नुकसान किंवा थकीत भाड्यासाठी ठराविक रक्कम कापली जाऊ शकते. अवास्तव खर्च मागितल्यास भाडेकरू ग्राहक न्यायालयात किंवा संबंधित प्राधिकरणाकडे दाद मागू शकतात. विश्वासाचे नाते टिकवण्यासाठी आणि कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी घर घेताना आणि सोडताना स्पष्ट संवाद आणि लेखी व्यवहार असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – Parents Assistance Bill: आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांचा कापला जाणार पगार; 'या' राज्यातील सरकारने लागू केला कठोर नियम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number