Tecno Camon Slim : ट्रान्ससिऑन होल्डिंग्सची (Transsion Holdings) उपकंपनी असलेल्या 'टेक्नो'नं जागतिक बाजारपेठेत आपला अत्यंत आकर्षक आणि नाविन्यपूर्ण 'Tecno Camon Slim' स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची जाडी केवळ 6.39 mm इतकी कमी आहे, ज्यामुळे हा सध्याच्या घडीला जगभरात उपलब्ध असलेल्या सर्वात स्लिम स्मार्टफोनपैकी एक ठरला आहे. स्लिम डिझाईन असूनही टिकाऊपणाच्या बाबतीत हा फोन अत्यंत मजबूत आहे. यात धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP69 + IP68 रेटिंग देण्यात आले असून लष्करी दर्जाचे MIL-STD-810 प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. ग्राहकांसाठी हा फोन बर्गंडी रेड (Burgundy Red), जंगल ग्रीन (Jungle Green), न्यू मोंड्रियन (New Mondrian), प्रिजम ब्लॅक (Prism Black) आणि व्हॅन गॉगब्ली (Van Gogh Blue) अशा 5 सुंदर रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
दमदार डिस्प्ले आणि जबरदस्त प्रोसेसर
– गेमिंग, स्क्रोलिंग आणि हाय-क्वालिटी व्हिडिओ पाहण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट डिस्प्ले आणि अत्याधुनिक हार्डवेअर देण्यात आले आहे.
– डिस्प्ले: 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.78-inch चा 1.5K AMOLED डिस्प्ले.
– प्रोसेसर आणि रॅम: फोनला वेगवान गती देण्यासाठी यात MediaTek Helio G200 Ultimate प्रोसेसर असून, 8GB रॅम आणि 256GB पर्यंतची अंतर्गत स्टोरेज क्षमता दिली आहे.
– कूलिंग सिस्टीम: फोन जास्त वेळ वापरताना गरम होऊ नये म्हणून 12-लेयर कूलिंग सिस्टीम, 3,205 चौरस मिमीचा स्टेनलेस स्टील व्हेपर चेंबर आणि एकूण 13,828 चौरस मिमीचे कूलिंग क्षेत्र यात समाविष्ट आहे.
– हा फोन Android 16 वर आधारित HiOS 16.2 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो आणि कंपनीने याला ३ जनरेशनचे अँड्रॉइड अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.
50MP सोनी कॅमेरा आणि कस्टमाइज्ड LED लायटिंग
फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी Tecno Camon Slim हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. याच्या मागच्या बाजूला 50-megapixel चा Sony LYT-600 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, ज्याचा आकार 1/1.56-inch असून यात फ्लिकर सेन्सर देखील समाविष्ट आहे. तसेच व्हिडिओ कॉलिंग आणि उत्कृष्ट सेल्फीसाठी यात 32-megapixel चा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनचे आणखी एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे कॅमेरा युनिटभोवती दिलेले 354 मिनी-LEDs. हे मिनी-LEDs वेगवेगळ्या दृश्यांनुसार सुंदर लायटिंग इफेक्ट्स देतात. वापरकर्ते हे लाईट्स कॉल, मेसेज किंवा चार्जिंग इंडिकेटर म्हणून आपल्या आवडीनुसार कस्टमाइज करू शकतात.
हेही वाचा – Telegram: टेलिग्राम पुन्हा संकटात! बंदी उठल्यानंतरही अॅप काम करत नाही? जाणून घ्या कारणं
5 वर्षे टिकणारी बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग
या स्मार्टफोनच्या स्लिम बॉडीमध्ये कंपनीने 5,600 mAh क्षमतेची अवाढव्य बॅटरी दिली आहे, जी 60W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. ही बॅटरी तब्बल 5 वर्षे टिकेल अशा प्रगत तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे, असा दावा कंपनीने केला आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर या फोनवरून तब्बल 54.04 तासांपर्यंत टॉक-टाइम आणि 576.24 तासांचा स्टँडबाय टाईम मिळतो. चांगल्या ऑडिओ गुणवत्तेसाठी यात डॉल्बी ॲटमॉस (Dolby Atmos) सपोर्ट असणारे ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स मिळतात. कनेक्टिव्हिटीसाठी 4G, NFC, Wi-Fi, Bluetooth, GPS, FM रेडिओ, USB Type-C आणि OTG हे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय इन्फ्रारेड रिमोट, इलेक्ट्रॉनिक कंपास आणि ॲम्बियंट लाईट यांसारखे महत्त्वाचे सेन्सर्सही यात दिले आहेत.
किंमत आणि बाजारपेठेतील उपलब्धता
टेक्नो कंपनीने या फोनच्या अधिकृत किमतीबाबत आणि विविध देशांमधील उपलब्धतेबाबत अद्याप पूर्ण तपशील जाहीर केलेले नाहीत. मात्र, हा स्मार्टफोन लवकरच ठराविक जागतिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणला जाणार आहे. आपल्या कमालीच्या स्लिम डिझाईन, वॉटरप्रूफ बांधणी आणि दमदार कॅमेरा वैशिष्ट्यांमुळे हा फोन मिडल-रेंज (मध्यम किंमत) श्रेणीतील इतर ब्रँड्सच्या स्मार्टफोनसमोर मोठे आव्हान उभे करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.