Tata Motors : टाटा मोटर्सची सातासमुद्रापार झेप! परदेशातून मिळाली 70,000 गाड्यांची महा-ऑर्डर; शेअर बाजारातही मोठी हालचाल

या करारामुळे भारतीय बनावटीच्या कमर्शियल वाहनांवरील जागतिक विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. या वृत्ताचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारातही पाहायला मिळाले.

Tata Motors : टाटा मोटर्सची सातासमुद्रापार झेप! परदेशातून मिळाली 70,000 गाड्यांची महा-ऑर्डर; शेअर बाजारातही मोठी हालचाल

Tata Motors : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली पकड अधिक घट्ट केली आहे. कंपनीची उपकंपनी 'PT Tata Motors Distribusi Indonesia' ला इंडोनेशियातून तब्बल 70,000 कमर्शियल वाहनांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऐतिहासिक करारामुळे टाटा मोटर्सच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठी चालना मिळणार असून, मंगळवारी शेअर बाजारातही या वृत्ताचे सकारात्मक पडसाद उमटलेले पाहायला मिळाले.

योद्धा पिक-अप आणि अल्ट्रा टी.7 ट्रकचा समावेश
इंडोनेशिया सरकारने आपल्या देशातील कृषी आणि ग्रामीण लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी टाटा मोटर्सची निवड केली आहे. या करारानुसार, टाटा मोटर्स प्रत्येकी 35,000 टाटा योद्धा (Tata Yodha) पिक-अप आणि अल्ट्रा टी.7 (Ultra T.7) ट्रक प्रत्येकी 35,000 एवढा पुरवठा करणार आहे. ही दोन्ही मॉडेल्स त्यांच्या मजबुतीसाठी आणि दुर्गम भागात काम करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. इंडोनेशियाची सरकारी कंपनी 'PT Agrinas Pangan Nusantara' या गाड्यांचा वापर कृषी पुरवठा साखळी आधुनिक करण्यासाठी करणार आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार गती
या वाहनांचा मुख्य वापर इंडोनेशियातील शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केला जाईल. विशेषतः 'कोपेरासी देसा' (ग्रामीण सहकारी संस्था) आणि 'केलुराहन मेरा पुतिह' सारख्या महत्त्वपूर्ण सरकारी प्रकल्पांना या वाहनांद्वारे बळ दिले जाणार आहे. यामुळे केवळ वाहतुकीचा खर्च कमी होणार नाही, तर ग्रामीण भागातील लोकांच्या उदरनिर्वाहाची साधने अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

हेही वाचा – PF Withdrawal via UPI: EPFO चा मोठा निर्णय, आता UPI द्वारे काढता येणार पीएफचे पैसे; लवकरच लाँच होणार नवीन ॲप

आव्हानात्मक परिस्थितीसाठी खास डिझाइन
टाटा मोटर्सच्या व्यवस्थापनानुसार, टाटा योद्धा आणि अल्ट्रा टी.7 ही वाहने इंडोनेशियाच्या भौगोलिक आणि आव्हानात्मक परिस्थितीचा विचार करून तयार करण्यात आली आहेत. कमी इंधन खर्च आणि जास्त टिकाऊपणा यामुळे या गाड्या ग्रामीण लॉजिस्टिक्ससाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहेत. ही डिलिव्हरी टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, तिथल्या सहकारी संस्थांद्वारे या वाहनांचे वाटप केले जाईल. या करारामुळे भारतीय बनावटीच्या कमर्शियल वाहनांवरील जागतिक विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तेजी
या मोठ्या ऑर्डरच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मंगळवारी टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकलचा शेअर 1.73% च्या वाढीसह 473 रुपयांवर बंद झाला. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 1.73 लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. तज्ज्ञांच्या मते, या परदेशी ऑर्डरमुळे येणाऱ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, शेअरवर गुंतवणूकदारांची बारीक नजर राहणार आहे.

हेही वाचा – India-US Deal : भारतीय व्यापाऱ्यांना अमेरिकडून 'पेनल्टी टॅरिफ' परत मिळणार? कशी मिळू शकते ही रक्कम?

(Disclaimer : ही बातमी केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने दिली असून तो कोणत्याही गुंतवणुकीबाबतचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफा-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number