LPG Rate Today : जागतिक बाजारात दरांचा भडका; तरीही सरकार LPG सिलेंडरवर देतंय 700 हून अधिक रुपयांची सवलत? संसदेत मोठी माहिती समोर

आंतरराष्ट्रीय पातळीवर चढ-उतार सुरू असूनही 24 जुलै रोजी घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती जैसे थे ठेवण्यात आल्या आहेत.<br/>

LPG Rate Today : जागतिक बाजारात दरांचा भडका; तरीही सरकार LPG सिलेंडरवर देतंय 700 हून अधिक रुपयांची सवलत? संसदेत मोठी माहिती समोर

LPG Rate Today : पश्चिम आशियातील युद्धाच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र, केंद्र सरकारने महागाईचा थेट फटका नागरिकांना बसू नये म्हणून देशांतर्गत गॅसचे दर आटोक्यात ठेवले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी संसदेत स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर चढ-उतार सुरू असूनही 24 जुलै रोजी घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती जैसे थे ठेवण्यात आल्या आहेत.

शासकीय आकडेवारीनुसार, जून 2026 मध्ये 14.2 किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची खरी बाजारपेठेतील किंमत 1695 रुपये इतकी होती. असे असतानाही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा केवळ 942 रुपयांमध्ये हा गॅस उपलब्ध करून दिला जात आहे. म्हणजेच प्रत्येक सिलेंडरवर सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या जवळपास 700 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा आर्थिक भार स्वतः सहन करत आहेत.

प्रमुख शहरांमधील आजचे सुधारित दर

सध्याच्या दरपत्रकानुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस 942 रुपये तर व्यावसायिक गॅस 2930 रुपयांना मिळत आहे. आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती सिलेंडर 941.50 रुपये आणि व्यावसायिक गॅस 2882 रुपयेला विक्री केला जात आहे. याशिवाय, बंगळुरू शहरात घरगुती सिलेंडरसाठी 948.50 रुपये तर व्यावसायिक सिलेंडरसाठी 3006 रुपये मोजावे लागत आहेत.

हेही वाचा – Todays Gold Rate : सणासुदीपूर्वी ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! सोने-चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

तेल कंपन्यांना 30 हजार कोटींची भरपाई

आंतरराष्ट्रीय दरातील तफावत भरून काढण्यासाठी आणि कंपन्यांना तोट्यातून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 ते 2026-27 दरम्यान तेल विपणन कंपन्यांना तब्बल 30000 कोटीची मदत दिली आहे. या मोठ्या अनुदानामुळेच जागतिक पातळीवरील इंधन संकटानंतरही देशातील ग्राहकांना अल्प दरात एलपीजी मिळणे शक्य झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number