Sunil Thapa Passes Away: धक्कादायक! ‘मेरी कोम’च्या प्रशिक्षकाचे निधन, वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे नेपाळी आणि भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.<br/>

Sunil Thapa Passes Away: धक्कादायक! ‘मेरी कोम’च्या प्रशिक्षकाचे निधन, वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sunil Thapa Passes Away: चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि 'मेरी कोम' चित्रपटात प्रियांका चोप्राच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील थापा यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे नेपाळी आणि भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

उपचारादरम्यान रुग्णालयात निधन
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील थापा यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना तातडीने काठमांडू येथील नॉर्विक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे अध्यक्ष राजेंद्र बहादूर सिंह यांनी सांगितले की, त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणले गेले होते. डॉक्टरांनी सकाळी 7:44 वाजता ईसीजी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

नेपाळी चित्रपटसृष्टीचा 'महाखलनायक'
सुनील थापा यांची गणना नेपाळी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांमध्ये केली जाते. त्यांनी 300 हून अधिक नेपाळी चित्रपटांमध्ये अभिनय केला. विशेषतः 'चिनो' चित्रपटातील 'रेट कैला' या त्यांच्या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आणि ते नेपाळी सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखले जाऊ लागले. सध्या ते 'एव्हरेस्ट फिल्म अकादमी'चे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.

हेही वाचा –Ghooskhor Pandat : मनोज तिवारीचा 'घुसखोर पंडित' अडचणीत, नेमकं कारण काय?

बॉलिवूडमधील संस्मरणीय प्रवास
केवळ नेपाळीच नव्हे, तर बॉलिवूडमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रियांका चोप्राच्या 'मेरी कोम' चित्रपटातील प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर नामांकन मिळाले होते. याशिवाय त्यांनी 'द फॅमिली मॅन' ही वेब सिरीज, 'एक दुजे के लिए' आणि 'आज की आवाज' यांसारख्या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. भोजपुरी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले योगदान दिले होते.

अभिनयापूर्वीचे अष्टपैलू जीवन
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सुनील थापा यांनी 1970 च्या दशकात मुंबईत मॉडेल म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. ते केवळ एक चांगले अभिनेतेच नव्हते, तर व्यावसायिक फुटबॉलपटू आणि फोटो जर्नलिस्ट देखील होते. त्यांचे कुटुंब मुंबईत वास्तव्यास असले तरी, ते स्वतः काठमांडूमध्ये राहत होते.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number