Children Drowned : मन हेलावणारी घटना! धार्मिक पर्वाच्या स्नानासाठी गेलेल्या 6 मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

स्थानिकांच्या मदतीने सर्व मुलांना तातडीने नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती सहाही जणांना मृत घोषित केले.

Children Drowned : मन हेलावणारी घटना! धार्मिक पर्वाच्या स्नानासाठी गेलेल्या 6 मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

6 Children Drowned in Pond: एक अत्यंत दुःखद आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी कर्म-धर्म उत्सवानिमित्त तलावात स्नानासाठी उतरलेल्या 6 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत 3 मुले आणि 3 मुलींचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे. सणाच्या उत्साही वातावरणात अचानक घडलेल्या या दुर्देवी प्रसंगामुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुलतानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 6 जणांनी गमावला जीव
बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंज येथील तलावाकाठी सर्व मुले एकत्र आनंदाने स्नानासाठी उतरली होती. दरम्यान, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एक मुलगा अचानक खोल पाण्यात जाऊन बुडू लागला. त्याला संकटात पाहून आणि वाचवण्याच्या आकांताने इतर मुलांनीही एकापाठोपाठ एक पाण्यात उड्या घेतल्या. दुर्दैवाने, कोणालाही पोहता येत नसल्यामुळे एकमेकांना वाचवण्याच्या या प्रयत्नात सहाही मुलांचा तलावाच्या खोल पाण्यात गुदमरून करुण अंत झाला.

हेही वाचा – Bomb Threat: मोठी बातमी! सोमनाथ मंदिर आणि भाजप कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

मृत मुलांची ओळख आणि कुटुंबीयांचा आक्रोश
या दुर्घटनेतील मृत मुलांची वये 12 ते 13 वर्षांच्या दरम्यान आहेत. मृत बालकांमध्ये राहुल कुमार व पूजा कुमारी या सख्ख्या भावंडांसह ज्योती कुमारी, मीनाक्षी कुमारी, आयुष कुमार आणि विकास कुमार यांचा समावेश आहे. ज्योती कुमारी वगळता इतर सर्व मुले विष्णू टोला वॉर्ड क्रमांक 27 मधील रहिवासी होती. घटनेचे वृत्त समजताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत टाहो फोडला, तर गावकऱ्यांनी तातडीने तलावातून मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.   

पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सर्व मुलांना तातडीने नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती सहाही जणांना मृत घोषित केले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया सुरू केली असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण बिहारमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Accident News: भरधाव वोल्वो कार दुभाजकाला धडकून पेटली; नामांकित न्यूरोसर्जनचा दुर्दैवी अंत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number