Shocking Video: बापरे! साखरेत माश्या, तरीही बनवला चहा, टपरीवरील अस्वच्छतेचा किळसवाणा प्रकार समोर; नेटकरी भडकले

या व्हिडिओमध्ये एका चहा विक्रेत्याचा अत्यंत निष्काळजी आणि किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Shocking Video: बापरे! साखरेत माश्या, तरीही बनवला चहा, टपरीवरील अस्वच्छतेचा किळसवाणा प्रकार समोर; नेटकरी भडकले

Street Tea Stall Viral Video : चहा म्हणजे बहुतांश भारतीयांचे हक्काचे एनर्जी ड्रिंक आणि अत्यंत आवडीचे पेय आहे. भारतात चहा आवडत नाही अशा व्यक्ती फारच कमी.. कारण घर असो वा ऑफिस, प्रत्येक ठिकाणी चहालाच पहिली पसंती दिली जाते. यामुळेच शहरांपासून ते गावांपर्यंत रस्त्याच्या कडेला चहाच्या टपऱ्यांवर ग्राहकांची नेहमीच प्रचंड गर्दी पाहायला मिळते. मात्र, बाहेर मिळणाऱ्या या चहाच्या स्टॉल्सवर अनेकदा स्वच्छतेकडे प्रचंड दुर्लक्ष केले जाते. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर अशाच एका चहा विक्रेत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, तो पाहिल्यानंतर बाहेर चहा पिण्यापूर्वी तुम्ही नक्कीच 10 वेळा विचार कराल.

साखरेतील माश्यांसह थेट कपामध्ये चहा
या व्हिडिओमध्ये एका चहा विक्रेत्याचा अत्यंत निष्काळजी आणि किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्या व्हायरल क्लिपमध्ये असे दिसते की, एका भांड्यात ठेवलेल्या साखरेभोवती आधीच डझनभर माश्या घोंघावत आहेत आणि ती साखर पूर्णपणे माश्यांनी भरलेली आहे. तरीही, तो चहा विक्रेता कोणताही संकोच न बाळगता, त्याच माश्यांनी माखलेली साखर चमच्याने उचलतो आणि थेट चहाच्या ग्लासमध्ये टाकून ग्राहकांना चहा देतो. धक्कादायक बाब म्हणजे, टपरीच्या अवतीभोवती उभे असलेले ग्राहकही हा गंभीर प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, परंतु या अस्वच्छतेबद्दल कोणीही त्याला जाब विचारताना किंवा थांबवताना दिसत नाही.

हेही वाचा – Washim Viral Video: जमिनीवर पडलेले पेढे पुन्हा विक्रीसाठी? वाशिममधील वायरल व्हिडिओने खळबळ

ट्विटरवर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा संताप
हा चीड आणणारा व्हिडिओ एक्सवर @Murti_Nain नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच लाखो लोकांनी तो पाहिला असून कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार लोकांच्या आरोग्याशी खेळणारा असून यामुळे गंभीर आजार होऊ शकतात, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. खाद्यपदार्थ आणि पेयांची विक्री करताना दुकानदारांनी किमान स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक असायला हवे, असा सल्लाही अनेक युजर्स देत आहेत.

बाहेर चहा पिताना सतर्क राहणे गरजेचे
इंटरनेटवर दररोज चहा बनवण्याच्या नवनवीन पद्धतींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, मात्र या व्हिडिओने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. रस्त्याकाठच्या टपऱ्यांवर अशा प्रकारे उघड्यावर ठेवलेले पदार्थ आणि साचलेली घाण आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे अशा टपऱ्यांवर चहाचा आस्वाद घेताना तो चहा किती सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात बनवला जात आहे, याबद्दल ग्राहकांनी स्वतः जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे.

हेही वाचा – Satara: हजारो लिटर दूध रस्त्यावर फेकलं, पण नेमकं कारण काय? साताऱ्यातील घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number