Stock Market Holiday: उद्यापासून सलग 3 दिवस शेअर बाजार बंद; काय आहे नेमकं कारण? वाचा

सलग 3 दिवस बंद राहिल्यानंतर आता सोमवार, 29 जून रोजी बाजार पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू होईल.<br/>

Stock Market Holiday: उद्यापासून सलग 3 दिवस शेअर बाजार बंद; काय आहे नेमकं कारण? वाचा

Stock Market Holiday: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शुक्रवार, 26 जून पासून भारतीय शेअर बाजारात सलग 3 दिवस सुट्टी असणार आहे. या कालावधीत मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) या दोन्ही प्रमुख एक्सचेंजवर इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग (SLB) अशा कोणत्याही प्रकारच्या विभागांमध्ये ट्रेडिंग होणार नाही. सलग 3 दिवस बंद राहिल्यानंतर आता सोमवार, 29 जून रोजी बाजार पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू होईल.

मुहर्रम आणि वीकेंडमुळे बाजाराला सलग सुट्ट्या
शेअर बाजार सलग 3 दिवस बंद राहण्यामागे सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांचे कारण आहे. शुक्रवार, 26 जून रोजी मुहर्रमनिमित्त देशभरातील शेअर बाजारांना अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे NSE आणि BSE सह मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) देखील सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00 या मुख्य सत्रात बंद राहील; मात्र MCX वर सायंकाळी 5:00 ते रात्री 11:55 या वेळेत इव्हनिंग सेशनचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालतील. यानंतर 27 जून आणि 28 जून रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार असल्याने वीकेंडमुळे बाजार पूर्णपणे बंद राहतील.

हेही वाचा – RBI Credit Card Rules: क्रेडिट कार्ड युजर्ससाठी आनंदाची बातमी! फसवणूक झाल्यास 5 दिवसांत मिळणार पैसे; काय आहे RBI चा नवा नियम?

29 जून रोजी पूर्ववत होणार कामकाज; जाणून घ्या पुढील सुट्टी कधी?
3 दिवसांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर सोमवार, 29 जून 2026 रोजी शेअर बाजारातील व्यवहार पुन्हा सुरू होतील. नेहमीच्या वेळापत्रकानुसार सकाळी 9:00 वाजता 15 मिनिटांचे प्री-ओपन सत्र होईल आणि त्यानंतर सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 या वेळेत मुख्य बाजार सुरू राहील. विशेष म्हणजे, यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत शनिवार-रविवार व्यतिरिक्त बाजाराला कोणतीही सार्वजनिक सुट्टी नाही. 26 जूननंतर थेट 14 सप्टेंबर 2026 रोजी गणेश चतुर्थी निमित्त शेअर बाजाराला पुढील अधिकृत सुट्टी असेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number