Gold-Silver Price Hike: सराफा बाजारात खळबळ; सोने-चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

जागतिक बाजारातील घडामोडींमुळे आज सकाळी बहुतेक प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

Gold-Silver Price Hike: सराफा बाजारात खळबळ; सोने-चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Gold-Silver Price Hike: आठवड्याचा शेवट उजाडला तरी मौल्यवान धातूंच्या किमतींमधील तेजी ओसरण्याचे नाव घेत नाहीये. शनिवारी देखील देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमती उच्च पातळीवर राहिल्याने ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे आज सकाळी बहुतेक प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली. डॉलर कमकुवत झाल्याने आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात 'स्पॉट गोल्ड'चा भाव प्रति औंस 4,181.50 डॉलर्सवर पोहोचल्याने देशातही सोन्याची मागणी आणि किमती दोन्ही वाढल्या आहेत.

दिल्लीत मोठी दरवाढ; जागतिक संकेतांचा परिणाम
देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम साठी Rs 1,47,160 वर गेला आहे. यापूर्वीच्या सत्रात तर दिल्लीच्या बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्यामध्ये तब्बल 3,300 ची मोठी झेप पाहायला मिळाली होती, ज्यामुळे हा दर प्रति 10 ग्रॅम साठी 1,50,800 वर पोहोचला होता. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी व्याजदर वाढीबाबत भूमिका घेण्याचे संकेत दिल्याने आणि तिथली रोजगाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमजोर आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याला मोठी गती मिळाली आहे.

प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर
देशातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या दरात नेहमीप्रमाणे तफावत पाहायला मिळत असून, चेन्नईमध्ये सध्या सोन्याचे दर सर्वात महाग आहेत. खालीलप्रमाणे प्रमुख शहरांमधील आजचे प्रति 10 ग्रॅम चे भाव आहेत:

दिल्ली: 22 कॅरेट सोन्यासाठी 1,34,910 तर 24 कॅरेट साठी 1,47,160 मोजावे लागत आहेत.

मुंबई आणि कोलकाता: आर्थिक राजधानी मुंबईसह कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 1,34,670 असून, 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,47,010 वर आहे.

चेन्नई: या दक्षिण भारतातल्या शहरात सोन्याची चमक सर्वाधिक महाग असून, इथे 22 कॅरेट सोन्याचा दर 1,37,010 आणि 24 कॅरेट चा दर 1,49,570 वर पोहोचला आहे.

पुणे आणि बंगळुरू: या दोन्ही शहरांमध्ये ग्राहकांना 22 कॅरेट साठी 1,34,760 तर 24 सोन्यासाठी 1,47,010 मोजावे लागत आहेत.

हेही वाचा – WhatsApp Business Rules: व्हॉट्सॲप बिझनेस युजर्ससाठी मोठी बातमी; मेटाकडून 'टोकन' आधारित नवीन बिलिंग प्रणाली जाहीर; नेमकं काय बदलणार?

चांदीनेही ओलांडली नवी पातळी; औद्योगिक मागणीचा जोर
सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत चांदीनेही बाजारात मोठी दरवाढ नोंदवली आहे. शनिवारच्या सकाळच्या सत्रात चांदीच्या किमतीत वाढ होऊन प्रति किलोचा दर 2,50,100 या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. औद्योगिक क्षेत्राकडून होणारा प्रचंड वापर आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे चांदीला मोठी मागणी येत आहे. जागतिक बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 'स्पॉट सिल्व्हर'चा भाव प्रति औंस 62.45 डॉलर्सवर व्यवहार करत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number