Automobile Industry Layoffs: ऑटोमोबाईल क्षेत्रात खळबळ; ‘या’ दिग्गज कंपनीत मोठी नोकरकपात, 2027 पर्यंत 8000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

प्रसारमाध्यमांतील अहवालानुसार, 2027 च्या अखेरपर्यंत सुमारे 8,000 नोकऱ्या कमी करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

Automobile Industry Layoffs: ऑटोमोबाईल क्षेत्रात खळबळ; ‘या’ दिग्गज कंपनीत मोठी नोकरकपात, 2027 पर्यंत 8000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

Automobile Industry Layoffs: जागतिक बाजारपेठेतील बदलती आव्हाने आणि वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी जर्मनीतील प्रसिद्ध लक्झरी कार उत्पादक कंपनी BMW ने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचे नियोजन केले आहे. प्रसारमाध्यमांतील अहवालानुसार, 2027 च्या अखेरपर्यंत सुमारे 8,000 नोकऱ्या कमी करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. तथापि, कर्मचाऱ्यांना थेट कामावरून काढून टाकण्याऐवजी कंपनी स्वेच्छानिवृत्तीचा (Voluntary Retirement) मार्ग उपलब्ध करून देणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण वाहन उद्योगात मोठे वादळ निर्माण झाले आहे.

जर्मनीतील 40,000 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय
AFP च्या वृत्तानुसार, BMW जर्मनीतील आपल्या 85,000 कायमस्वरूपी कार्यालयीन कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 40,000 कर्मचाऱ्यांना येत्या ऑक्टोबरपासून स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देण्याच्या तयारीत आहे. सध्या तरी उत्पादन (Manufacturing) विभागातील कामगारांना या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. 2027 च्या अखेरपर्यंत एकूण कर्मचाऱ्यांमध्ये 8,000 ची कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवून कंपनी आणि कामगार प्रतिनिधींमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून चर्चा चालू आहे.

इलेक्ट्रिक वाहनांतील कमी नफा अन् चिनी स्पर्धेचा मोठा दणका
सध्या संपूर्ण युरोपियन कार उत्पादक क्षेत्राला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमधून मिळणारा कमी नफा, अमेरिकेचे आयात शुल्क (Tariff) धोरण आणि चिनी कंपन्यांचे वाढते आव्हान यांमुळे BMW वर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. चीनमधील मंदावलेली अर्थव्यवस्था आणि अपेक्षेपेक्षा कमी झालेली विक्री यामुळे कंपनीने यापूर्वीच आपल्या घसरत्या नफ्याबाबत चिंता व्यक्त केली होती.

हेही वाचा – Banking Jobs: मोठी बातमी! 3 आघाडीच्या बँकांतून 7,700 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात; 'या' कौशल्याशिवाय बँकेत नोकरीची संधी मिळणे कठीण

चीनमधील विक्रीत तब्बल 30 टक्क्यांची घसरण
BMW साठी चीन ही सर्वांत मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. मात्र, गेल्या वर्षी चीनमधील कंपनीची विक्री 2017 नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचली. यातच एप्रिल ते जून या तिमाहीत चीनमधील गाड्यांच्या वितरणात (Deliveries) तब्बल 30 टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली आहे. याचा थेट फटका कंपनीच्या आर्थिक उत्पन्नावर बसला आहे. BMW व्यतिरिक्त फोक्सवॅगन (Volkswagen) हजारो नोकऱ्या कमी करण्याच्या तयारीत आहे, तर मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) देखील खर्च कपातीसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number