Lahaul Ghat Landslide: काळजाचा थरकाप उडवणारी घटना; धावत्या टाटा सुमोवर कोसळली दरड; 6 महिन्यांच्या बाळासह 13 जणांचा दुर्दैवी अंत

हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीती जिल्ह्यातील पांगी-उदयपूर मार्गावरील लाहौल घाटात दुपारी एक अत्यंत वेदनादायी अपघात घडला.

Lahaul Ghat Landslide: काळजाचा थरकाप उडवणारी घटना; धावत्या टाटा सुमोवर कोसळली दरड; 6 महिन्यांच्या बाळासह 13 जणांचा दुर्दैवी अंत

Lahaul Ghat Landslide: सध्या देशभरात अनेक ठिका मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीती जिल्ह्यातील पांगी-उदयपूर मार्गावरील लाहौल घाटात दुपारी एक अत्यंत वेदनादायी अपघात घडला. सुमारे 60 ते 70 km अंतरावर असलेल्या कुडूनाला परिसरातून जात असलेल्या एका टाटा सुमो टॅक्सीवर अचानक डोंगरावरून मोठा खडक कोसळला. हा आघात इतका भीषण होता की वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला असून सुमोची केवळ नंबर प्लेट दिसत होती.

15 प्रवाशांपैकी 13 जणांचा मृत्यू; 2 जण गंभीर जखमी

स्थानिक पर्यटकांना ने-आण करणाऱ्या या टॅक्सीमध्ये एकूण 15 नागरिक प्रवास करत होते. या अपघातात 6 महिन्यांच्या बालकासह तब्बल 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. भरमौर-पाँगीचे आमदार जनक राज यांनी या घटनेला दुजोरा दिला असून अपघातात गंभीर जखमी झालेल्या 2 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे पथक तात्काळ दाखल झाले असून ढिगारा बाजूला करून अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे.

हेही वाचा – Dharmendra Pradhan resignation: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर कॉक्रोच जनता पार्टी ठाम; सरकारने मागितला उद्यापर्यंतचा वेळ, काय घेणार निर्णय?

रस्ता मोकळा होताच काही वेळातच काळाचा घाला

दरम्यान, उदयपूर-किलाड हा महामार्ग काही दिवसांपासून बंद असल्यामुळे तिंदी भागात अनेक वाहने अडकून पडली होती. रस्ता वाहतुकीसाठी खुला होताच ही टॅक्सी पांगीच्या दिशेने निघाली होती; मात्र दुर्दैवाने कडूनाला येथे पोहोचताच हा अपघात घडला. याव्यतिरिक्त, मंडी जिल्ह्यातील जोगिंद्रनगर येथील गुम्मा भागात झालेल्या भुस्खलनात दोन कुटुंबे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number