US-Iran War : होर्मुझच्या खाडीत पुन्हा युद्धाची ठिणगी; इराणी सैन्याकडून व्यापारी जहाजावर भीषण गोळीबार; कंट्रोल रूम उद्ध्वस्त

'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (IRGC) एका व्यापारी जहाजावर तुफान गोळीबार करून दहशत निर्माण केली आहे.

US-Iran War : होर्मुझच्या खाडीत पुन्हा युद्धाची ठिणगी; इराणी सैन्याकडून व्यापारी जहाजावर भीषण गोळीबार; कंट्रोल रूम उद्ध्वस्त

US-Iran War : मध्यपूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेने युद्धविरामाची मुदत वाढवलेली असतानाही मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याऐवजी अधिकच चिघळला आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (IRGC) एका व्यापारी जहाजावर तुफान गोळीबार करून दहशत निर्माण केली आहे. या भीषण हल्ल्यात जहाजाचे मुख्य नियंत्रण कक्ष (Control Room) पूर्णपणे निकामी झाले आहे.

पाकिस्तानातील चर्चेची फेरी फिसकटली अन् तणाव वाढला
पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराण आणि अमेरिका यांच्यात होणारी चर्चेची दुसरी फेरी अयशस्वी ठरली. या चर्चेचा फज्जा उडाल्यानंतर इराणने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांतील ही तिसरी मोठी घटना असून इराणने आता थेट व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

नेमकं काय घडलं?
'यूके मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स'ने दिलेल्या अहवालानुसार, ओमानच्या किनाऱ्यापासून साधारण 15 समुद्री मैलावर हा हल्ला झाला. इराणच्या वेगवान गनबोट्सनी अचानक कंटेनर जहाजाला वेढा घातला. काही क्षणातच इराणी सैनिकांनी जहाजाच्या दिशेने गोळीबार केला, ज्याचा मुख्य फटका जहाजाच्या कंट्रोल रूमला बसला. सुदैवाने, या हल्ल्यात जीवितहानी झालेली नाही आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.

हेही वाचा – India Crude Oil: मध्य पूर्वेतील युद्धाचे भारताला चटके, तेल आयात घटली; पण संकटाच्या काळात 'हा' देश ठरला भारतासाठी 'संकटमोचक'

ट्रम्प यांची भूमिका आणि तेलाच्या किमतींचे संकट
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविराम वाढवला असला, तरी इराणच्या या ताज्या कारवाईमुळे परिस्थिती पुन्हा स्फोटक बनली आहे. बुधवारी हा युद्धविराम संपुष्टात येत असून, त्यापूर्वीच इराणने 'शक्तीप्रदर्शन' सुरू केले आहे. होर्मुझच्या खाडीतून जागतिक तेल व्यापार चालतो; त्यामुळे या हल्ल्यांचे थेट पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उमटून तेलाच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. इराणच्या या प्रक्षोभक कृतीनंतर आता अमेरिका प्रत्युत्तरादाखल कोणती लष्करी कारवाई करणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number