Spain Migrant Crisis: स्थलांतरितांचे मोठे संकट! 24 तासांत 49,000 लोकांची घुसखोरी; सीमेवर सैन्याची कारवाई

सैन्य आणि स्थलांतरित यांच्यातील चकमकीच्या आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Spain Migrant Crisis: स्थलांतरितांचे मोठे संकट! 24  तासांत 49,000 लोकांची घुसखोरी; सीमेवर सैन्याची कारवाई

Spain Migrant Crisis Ceuta Morocco Border: उत्तर आफ्रिकेतील स्पेनच्या सेउटा (Ceuta) या सीमेवर गेल्या 24 तासांत तब्बल 49,000 स्थलांतरितांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याने स्पेनसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मोरक्कोमधून समुद्र आणि जमिनीच्या मार्गाने या लोकांनी स्पेनमध्ये घुसखोरी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्पॅनिश सरकारने तातडीने सीमेवर सैन्याची तैनाती केली असून, चकमकीच्या आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 2021 नंतर स्पेनला तोंड द्यावे लागणारे हे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचे संकट मानले जात आहे.

युरोपमध्ये प्रवेशाचे मुख्य दार आणि सीमा ओलांडण्याची कारणे
उत्तम आर्थिक संधी, रोजगाराचा शोध आणि स्वदेशातील अनिश्चिततेतून सुटका मिळवण्यासाठी हे स्थलांतरित युरोपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. उत्तर आफ्रिकेतील सेउटा आणि मेलिला ही दोन शहरे स्पेनच्या अधिकाराखाली असून ती आफ्रिकेला थेट युरोपियन युनियनशी जोडतात. मोरक्कोच्या फ्निदेक किंवा बेल्योनेच या भागांतून अनेकजण पोहत किंवा जमिनीवरील कडक तटबंदी ओलांडण्याचा धोका पत्करतात. स्पॅनिश अधिकारी काही स्थलांतरितांना पुन्हा माघारी धाडतात, तर काही जणांना आश्रयासाठी अर्ज करण्याची संधी दिली जाते.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अन् मानवी तस्करांचे जाळे
समुद्रमार्गे येणाऱ्या स्थलांतरितांना थेट मोरक्कोमध्ये हद्दपार करण्यावर स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे हे संकट अधिक गंभीर बनल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या न्यायालयीन निर्णयाचा गैरफायदा घेत मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना समुद्रमार्गे स्पेनमध्ये धाडण्यास सुरुवात केली असावी, असा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, 5 लाख बेकायदेशीर स्थलांतरितांना नियमित करण्याच्या निर्णयामुळे ही घुसखोरी वाढल्याचा दावा मात्र स्पॅनिश अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे.

हेही वाचा – Thailand Cheap Tour Package: स्वस्तात मस्त परदेशवारी पडली महागात; 3 भारतीयांचे अपहरण करून 70 लाखांची खंडणी मागितली

समुद्रकिनाऱ्यावरील थरार; व्हिडिओ व्हायरल
सेउटा येथील ताराजल समुद्रकिनाऱ्यावरील काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हजारो स्थलांतरित लाटा रोखणारी भिंत ओलांडून किनाऱ्यावर उतरताना दिसत आहेत. यात पुरुषांची संख्या मोठी असली, तरी अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. किनाऱ्यावर पोहोचलेले काही स्थलांतरित ‘व्हिवा एस्पान्या’च्या (स्पेनचा विजय असो) घोषणा देत आनंद व्यक्त करताना दिसले. कडक पोलीस बंदोबस्त आणि अडथळे असूनही केवळ तीव्र इच्छाशक्तीमुळेच आपण इथे पोहोचू शकलो, अशी प्रतिक्रिया काही स्थलांतरितांनी दिली.

युरोपियन युनियनची चिंता आणि पुढील आव्हाने
या अभूतपूर्व संकटामुळे केवळ स्पेनच नव्हे तर संपूर्ण युरोपियन युनियनची चिंता वाढली आहे. निर्वासितांच्या तात्पुरत्या शिबिरांवर प्रचंड ताण आला असून सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. मोरक्कोसोबतच्या सीमेवर कडक पाळत ठेवणे आणि मानवी तस्करीच्या नेटवर्कवर कठोर कारवाई करणे हे आता स्पेन सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.

हेही वाचा – Infosys Fine: कामगार कायद्यांच उल्लंघन भोवलं; ‘या’ देशात इन्फोसिसला 2 कोटींचा दंड; काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number