Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीवर दु:खाचा डोंगर, भावाच्या निधनाने पुरती कोलमडली अभिनेत्री

सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.<br/>

Sonalee Kulkarni:  सोनाली कुलकर्णीवर दु:खाचा डोंगर, भावाच्या निधनाने पुरती कोलमडली अभिनेत्री

Sonalee Kulkarni: मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या कुटुंबावर सध्या शोकाकळा पसरली आहे. सोनालीचा लाडका मावस भाऊ अनिरुद्ध चेरेकर याचे निधन झाले असून, सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

“निस्वार्थ प्रेम करणारा शुद्ध आत्मा…”
आपल्या भावाच्या निधनाने खचलेल्या सोनालीने बालपणापासूनच्या काही खास आठवणी आणि फोटो शेअर केले आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आमचा अनुम्मा एका चांगल्या जगासाठी हे जग सोडून गेला आहे. तू माझ्या ओळखीतील सर्वात शुद्ध, निष्पाप आणि अध्यात्मिक व्यक्ती होतास. तुला सर्वांशी मिळून-मिसळून राहायला आणि निस्वार्थ प्रेम करायला आवडायचं.”

चहा आणि तबल्याच्या आठवणीत अभिनेत्री भावूक
सोनालीने आपल्या भावाच्या गुणांचे कौतुक करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. “तुला सर्व गाणी पाठ असायची, तू तबला अतिशय सुंदर वाजवायचास आणि तुझ्या हाताच्या चहाची चव तर अविस्मरणीय होती. तू आयुष्यभर सर्वांना फक्त प्रेमच दिलं,” अशा शब्दांत तिने आपल्या भावाप्रती आदर व्यक्त केला आहे. सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये रक्षाबंधनाचे आणि कौटुंबिक सोहळ्यांचे काही गोड क्षण पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – Kantara Controversy: रणवीर सिंगवर अटकेची टांगती तलवार? ‘देवा’ची थट्टा नडली; उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

चाहत्यांकडून सांत्वन
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करणाऱ्या सोनालीने हे दुःखद वृत्त देताच तिचे चाहते आणि सिनेसृष्टीतील सहकलाकार हळहळले आहेत. तिच्या या कठीण काळात अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनिरुद्धला श्रद्धांजली अर्पण केली असून कुलकर्णी कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number