Sonakshi Sinha Viral Video: सोनाक्षी-जहीरमध्ये कडाक्याचं भांडण, घराबाहेर राहिली अभिनेत्री; गोंधळ ऐकून शेजारीही बाहेर आले अन्

सोनाक्षी सध्या जहीर इक्बाल आणि त्याच्या कुटुंबासोबतच राहत आहे. जहीरने तिला वेगळ्या घरात राहण्याचा पर्याय दिला होता, मात्र सोनाक्षीने त्याच्या कुटुंबासोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केले.

Sonakshi Sinha Viral Video: सोनाक्षी-जहीरमध्ये  कडाक्याचं भांडण, घराबाहेर राहिली अभिनेत्री; गोंधळ ऐकून शेजारीही बाहेर आले अन्

Sonakshi Sinha Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या असलेल्या सोनाक्षीने अभिनेता जहीर इक्बालसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. अनेकांनी तिच्यावर टीका केली, तर काहींनी थेट खडेबोलही सुनावले. मात्र या सगळ्या टीकेकडे दुर्लक्ष करत सोनाक्षी आपल्या वैयक्तिक आयुष्यात आनंदी असल्याचे दिसते. लग्नानंतर सोनाक्षी सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाली असून ती चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी आणि जहीर परदेशात सुट्टीसाठी गेले होते. या ट्रिपदरम्यान दोघांनी एकमेकांसोबत घालवलेले खास क्षणही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षीने जहीरसोबतच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे.

हेही वाचा – Pranit More on Jokes on Salman Khan : पुन्हा सलमान खानवर विनोद करणार का? प्रणित मोरेने दिलं उत्तर, ‘हात जोडले…’

सोनाक्षी सध्या जहीर इक्बाल आणि त्याच्या कुटुंबासोबतच राहत आहे. जहीरने तिला वेगळ्या घरात राहण्याचा पर्याय दिला होता, मात्र सोनाक्षीने त्याच्या कुटुंबासोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केले. अशातच आता या जोडप्याचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी बराच वेळ घराबाहेर उभी असल्याचे दिसते. जहीर घरात असतानाही तो तिला दरवाजा उघडून देत नाही. बाहेर उभी असलेली सोनाक्षी वैतागलेली दिसत असून आतून जहीर कॅमेऱ्यातून तिची अवस्था पाहत हसत असल्याचे दिसते. सोनाक्षीचा आवाज ऐकून शेजारीसुद्धा घराबाहेर येतात, मात्र तरीही जहीर दरवाजा उघडत नाही. हा सगळा प्रकार जहीर सोनाक्षीशी थट्टा करत असल्याचा असल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होते.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : ‘स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…’, रितेश भाऊ घेऊन येत आहे महाराष्ट्राचं तुफान!

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असला, तरी अनेक नेटकऱ्यांना तो फारसा आवडलेला दिसत नाही. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने तर थेट कमेंट करत ‘तुझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे’ असे म्हणत जहीरने सोनाक्षीला बाहेर थांबवणे योग्यच असल्याचा सूर लावला. सोनाक्षी आणि जहीर यांचे अशा प्रकारचे मजेशीर, मस्तीखोर व्हिडीओ याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघेही एकमेकांसोबत हसत-खेळत वेळ घालवताना नेहमीच दिसतात, मात्र यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number