Rahul Gandhi On NEET Paper Leak: ‘दागिने विकले, कर्ज काढलं, पण मिळालं काय?’; NEET पेपरफुटीवर राहुल गांधींचा सरकारला संतप्त सवाल

पेपरफुटीच्या प्रकरणाचा वाढता दबाव आणि देशभरातील आंदोलनांनंतर अखेर केंद्र सरकारने या तपासाची धुरा CBI कडे सोपवली आहे.<br/>

Rahul Gandhi On NEET Paper Leak: ‘दागिने विकले, कर्ज काढलं, पण मिळालं काय?’; NEET पेपरफुटीवर राहुल गांधींचा सरकारला संतप्त सवाल

Rahul Gandhi On NEET Paper Leak: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या NEET UG 2026 परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. या गंभीर प्रकरणावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. त्यांनी या घटनेला ‘भ्रष्ट भाजप व्यवस्थेचा’ परिणाम असल्याचे संबोधत, हे केवळ प्रशासकीय अपयश नसून देशातील युवकांच्या भविष्याविरुद्ध केलेला एक मोठा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. पेपरफुटीच्या प्रकरणाचा वाढता दबाव आणि देशभरातील आंदोलनांनंतर अखेर केंद्र सरकारने या तपासाची धुरा CBI कडे सोपवली आहे.

‘अमृत काळ’ आता ‘विष काळ’ बनला; राहुल गांधींचा बोचरी टीका
राहुल गांधी यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची कठोर मेहनत आणि त्यांच्या पालकांचे त्याग या भ्रष्ट व्यवस्थेने धुळीस मिळवले आहेत. पालकांनी कर्ज काढून आणि दागिने विकून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे केले, मात्र त्याबदल्यात त्यांना केवळ पेपरफुटी आणि सरकारी निष्काळजीपणा मिळाला आहे.” पंतप्रधानांच्या ‘अमृत काळा’चा उल्लेख करत त्यांनी सध्याची परिस्थिती देशासाठी ‘विष काळ’ बनल्याची टीका केली.

शिक्षण क्षेत्रातील संघटित भ्रष्टाचाराचा आरोप
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे नमूद केले की, शिक्षण क्षेत्रातील संघटित भ्रष्टाचारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. “वारंवार ‘पेपर माफिया’ नामानिराळा राहतो आणि लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा मानसिक तणाव व अनिश्चिततेला सामोरे जावे लागते. जर भविष्य कठोर परिश्रमावर नव्हे, तर केवळ पैसा आणि वशिल्यावर ठरणार असेल, तर शिक्षणाचा मूळ उद्देशच संपला आहे,” असे सांगत त्यांनी भाजपच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

NEET परीक्षा रद्द; जूनमध्येच फेरपरीक्षेची शक्यता
राजस्थानमधील सीकर येथून प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर NTA ने NEET UG 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. SOG ने दिलेल्या माहितीनुसार, एका ‘अंदाजित प्रश्नपत्रिकेतील’ 120 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत जसेच्या तसे आले होते, ज्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले. आता या प्रकरणाचा सखोल तपास CBI कडून केला जाणार आहे.

हेही  वाचा – NEET Paper Leak Update: NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा; राजस्थानमधून नव्हे, तर महाराष्ट्रातून फुटला पेपर

विद्यार्थ्यांना दिलासा: नोंदणी शुल्क परत मिळणार
NTA ने स्पष्ट केले आहे की, रद्द झालेल्या परीक्षेसाठी उमेदवारांनी भरलेले नोंदणी शुल्क पालक आणि विद्यार्थ्यांना परत केले जाईल. तसेच, NEET UG 2026 ची फेरपरीक्षा लवकरच आयोजित करण्यात येणार असून, ही परीक्षा जून महिन्यामध्येच पार पडण्याची दाट शक्यता आहे. नवीन तारखा आणि प्रवेशपत्रांबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number