Soha Ali Khan : इनायाने बनवले घरासाठी ‘कडक शिस्ती’चे नियम! आई सोहाने शेअर केली मजेशीर यादी

छोटी इनाया आता घराची छोटी मॉनिटर झाली असून तिने सर्वांसाठी काही महत्त्वाचे नियम आखले आहेत. तिने स्वतःच्या हाताने लिहिलेले हे नियम वाचून तुम्हालाही हसू येईल.

Soha Ali Khan : इनायाने बनवले घरासाठी ‘कडक शिस्ती’चे नियम! आई सोहाने शेअर केली मजेशीर यादी

Soha Ali Khan : अभिनेत्री सोहा अली खानने गुरुवारी तिची मुलगी इनाया नौमी खेमू हिने बनवलेल्या "घराच्या नियमांची" (House Rules) एक मजेशीर झलक चाहत्यांसोबत शेअर केली. सोहाने सोशल मीडियावर इनायाने स्वतःच्या हाताने लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो पोस्ट केला असून, "हे घराचे काही चांगले नियम आहेत," असे अभिमानाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
इनायाच्या डायरीतील 'हाऊस रूल्स'
छोटी इनाया आता घराची छोटी मॉनिटर झाली असून तिने सर्वांसाठी काही महत्त्वाचे नियम आखले आहेत. तिने हाताने लिहिलेल्या या नोटमध्ये खालील नियमांचा समावेश आहे:
1- पायऱ्यांवर धावू नका.
2- परवानगी घेतल्याशिवाय कधीही 'ओरियो' (बिस्किट) उचलून खाऊ नका.
3- तुम्ही केलेली अस्वच्छता स्वतः स्वच्छ करा.
4- कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्यापूर्वी विचारा.
5- खेळताना नेहमी इतरांनाही सामावून घ्या.
6- सर्वांशी चांगले वागा.
7- कोणालाही दुखावू नका.

या नियमांच्या खाली इनायाने एक छोटा "क्विझ" (कोडे) विभागही जोडला आहे. जसे शाळेतील अभ्यास लक्षात राहण्यासाठी क्विझ असते, तसेच वरील नियम व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी ही क्विझ आहे.

("क्विज़ * मेरे घर के नियम हैं- कभी किसी को _____ मत करो। सभी के साथ _____ रहो। अगर ______ हो तो ______ मत करो।")

तसेच पानावर खाली तिने "लवकर करा आणि नियमांचे पालन करा," "घराचे नियम," आणि "लक्ष देऊन ऐका" अशा सूचनाही लिहिल्या आहेत.

हेही वाचा – Bhooth Bangla Teaser: 'भूत बंगला' टीझर आऊट; दहशत आणि कॉमेडीचा राडा, अक्षय-प्रियदर्शनची जादू 16 वर्षांनंतर पुन्हा चालणार?

सोहा अली खानचा मातृत्वाचा प्रवास
सोहा अली खान नेहमीच आपल्या लाडक्या लेकीसोबतचे आणि तिच्या वाढीच्या टप्प्यातील आनंदाचे क्षण चाहत्यांशी शेअर करत असते. इनायाचा जन्म सप्टेंबर 2017 मध्ये झाला. सोहा आणि कुणाल खेमू यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर जानेवारी 2015 मध्ये लग्न केले. व्यावसायिक आयुष्यात सोहाने शाहिद कपूरसोबत 'दिल मांगे मोर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने 'रंग दे बसंती', 'तुम मिले' आणि '99' सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे.

विविध संस्कृतींचा मेळ
सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे वेगवेगळ्या धर्मांतून आलेले आहेत. सोहा मुस्लिम कुटुंबातील आहे, तर कुणाल हिंदू कुटुंबातला आहे. असे असूनही, हे जोडपे सर्व धर्मांचे सण सारख्याच उत्साहाने साजरे करताना दिसते. इनायावरही ते दोन्ही संस्कृतींचे संस्कार करत आहेत, ज्याची झलक अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून येते.

हेही वाचा – CSK ला चित्रपटांची गाणी वापरणं पडलं महागात; या टीव्ही कंपनीने ठोकला कॉपीराइटचा दावा, काय आहे प्रकरण?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number