Passport Fee Hike: केंद्र सरकारकडून पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ; ‘या’ तारखेपासून लागू होणार नवीन दर

तुम्ही नवीन पासपोर्ट काढण्याच्या तयारीत असाल किंवा तुमच्या जुन्या पासपोर्टचे नूतनीकरण (Renew) करायचे असेल, तर खिशाला जास्त कात्री लागणार आहे.

Passport Fee Hike: केंद्र सरकारकडून पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ; ‘या’ तारखेपासून लागू होणार नवीन दर

Passport Fee Hike:  आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही नवीन पासपोर्ट काढण्याच्या तयारीत असाल किंवा तुमच्या जुन्या पासपोर्टचे नूतनीकरण (Renew) करायचे असेल, तर खिशाला जास्त कात्री लागणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या शुल्कात लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सुधारित नवीन दर 1 जुलै 2026 पासून देशभरात लागू होणार आहेत. सरकारने 'पासपोर्ट नियम, 1980' मध्ये सुधारणा करत 'सामान्य' (Normal) आणि 'तत्काळ' (Tatkaal) अशा दोन्ही श्रेणींमधील सेवांचे शुल्क वाढवले आहे. त्यामुळे नागरिकांना जुन्या म्हणजेच कमी दरात अर्ज करायचा असल्यास, त्यांनी 1 जुलै 2026 पूर्वी आपली प्रक्रिया पूर्ण करून घेणे फायदेशीर ठरेल.

प्रौढ नागरिकांसाठी (18 वर्षांवरील) सुधारित शुल्क रचना

18 वर्षांवरील नागरिकांसाठी नवीन आणि पुन्हा जारी केल्या जाणाऱ्या पासपोर्टचे दर खालीलप्रमाणे असतील:

36-पानांचा पासपोर्ट: 2,500 (सामान्य) आणि 5,000 (तत्काळ).

60-पानांचा पासपोर्ट: 3,500 (सामान्य) आणि 6,000 (तत्काळ).

हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट (36 पाने): 5,000 (सामान्य) आणि 7,500 (तत्काळ).

हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट (60 पाने): 6,000 (सामान्य) आणि 8,500 (तत्काळ).

अल्पवयीन मुलांसाठी (18 वर्षांखालील) नवीन दर
18 वर्षांखालील मुलांच्या पासपोर्टच्या शुल्कातही खालीलप्रमाणे वाढ करण्यात आली आहे:

36-पानांचा नवीन/पुन्हा जारी केलेला पासपोर्ट: 1,750 (सामान्य) आणि 4,250 (तत्काळ).

हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट (36 पाने): 4,250 (सामान्य) आणि 6,750 (तत्काळ).

हेही वाचा – Passport Walk-In Facility: पासपोर्टसाठी आता ताटकळत राहण्याची गरज नाही! 45 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागल्यास थेट ‘वॉक-इन’ प्रवेशाची सुविधा

इतर इतर सेवा आणि जुन्या दरांशी तुलना
इतर आवश्यक कागदपत्रांसाठी आता पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्रासाठी (PCC) 750, ओळख प्रमाणपत्रासाठी (Certificate of Identity) 1,000, तर परदेशातील आपत्कालीन प्रमाणपत्रासाठी 15 डॉलर्स मोजावे लागतील. पूर्वी 36-पानांच्या सामान्य पासपोर्टसाठी 1,500 शुल्क होते, ज्यात आता 1,000 ची वाढ होऊन ते 2,500 झाले आहे. तर 60-पानांच्या पासपोर्टचे शुल्क 2,000 वरून 3,500 करण्यात आले आहे. दरम्यान, मंत्रालयाने 14 व्या 'पासपोर्ट सेवा दिवसा'निमित्त पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, पासपोर्ट हे केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचे अधिकृत दस्तऐवज असून, तो नागरिकत्वाचा अंतिम पुरावा मानला जाऊ शकत नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number