Dead Fly Found In Train Food: तेजस एक्सप्रेसमध्ये किळसवाणा प्रकार; शाकाहारी बिर्याणीत आढळली मेलेली माशी; फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप

एका प्रवाशाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत, त्याला रेल्वेत देण्यात आलेल्या शाकाहारी बिर्याणी कॉम्बो मीलमध्ये (Veg Biryani Combo Meal) मेलेली माशी आढळल्याचा गंभीर दावा केला आहे.

Dead Fly Found In Train Food: तेजस एक्सप्रेसमध्ये किळसवाणा प्रकार; शाकाहारी बिर्याणीत आढळली मेलेली माशी; फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप

Dead Fly Found In Train Food:  रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या अन्नाच्या दर्जावरून अनेकदा वाद समोर येत असतात. आता असाच एक धक्कादायक प्रकार ‘तेजस एक्सप्रेस’ सारख्या व्हीआयपी आणि प्रीमियम ट्रेनमध्ये उघडकीस आला आहे. एका प्रवाशाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत, त्याला रेल्वेत देण्यात आलेल्या शाकाहारी बिर्याणी कॉम्बो मीलमध्ये (Veg Biryani Combo Meal) मेलेली माशी आढळल्याचा गंभीर दावा केला आहे. या घटनेचा फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून, प्रवाशाने थेट आयआरसीटीसी (IRCTC) आणि रेल्वेमंत्र्यांना टॅग करून या भोंगळ कारभारावर जाब विचारला आहे. या प्रकारामुळे रेल्वेच्या व्हीआयपी खानपान सेवेच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा – Ketan Agarwal Case: ‘सोनम जामिनावर सुटली नसती तर…’ पुण्यातील केतन अग्रवाल त्याकांडानंतर राजा रघुवंशीच्या आईचा संताप; म्हणाली…

रेल्वे अधिकाऱ्यांनी मागितली माफी; प्रवाशाने नाकारले पर्यायी जेवण

हा संतापजनक प्रकार अहमदाबाद-मुंबई सेंट्रल तेजस एक्सप्रेस (गाडी संख्या 82902) मध्ये घडल्याचे समोर आले आहे. @SumitResearch नावाच्या ‘X’ (ट्विटर) युजरने या घटनेची माहिती दिली. प्रवाशाने जेव्हा जेवणाचा डबा उघडला, तेव्हा त्यात मेलेली माशी तरंगताना दिसली. महागडे तिकीट काढूनही प्रवाशांच्या आरोग्याशी असा खेळ खेळला जात असल्यामुळे संबंधित प्रवाशाने तीव्र संताप व्यक्त केला. हे प्रकरण सोशल मीडियावर गाजू लागताच ट्रेन कॅप्टन आणि ऑन-बोर्ड कॅटरिंग व्यवस्थापकांनी तातडीने त्या प्रवाशाची भेट घेतली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी या निष्काळजीपणाबद्दल प्रवाशाची माफी मागितली आणि दुसरे जेवण देण्याची ऑफर दिली; मात्र प्रवाशाने रेल्वेचे अन्न खाण्यास स्पष्ट नकार दिला.

सोशल मीडियावर युजर्सचा संताप; रेल्वेच्या कॅटरिंग व्यवस्थेवर टीका
या घटनेचा फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. एका युजरने संतापून लिहिले, “हे अत्यंत भयानक आहे, यामुळेच आता अनेक लोक रेल्वेचे जेवण न घेता प्रवास करणे पसंत करतात.” तर दुसऱ्या एका युजरने उपरोधिक टोला लगावत म्हटले, “हे जेवण महिनाभरापूर्वी तयार केल्यासारखे दिसत आहे.” काही युजर्सनी तर रेल्वेचे अन्न खाण्यापेक्षा उपाशी प्रवास करणे कधीही सुरक्षित असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेमुळे प्रीमियम गाड्यांमधील कॅटरिंगच्या स्वच्छतेवर आणि देखरेखीवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number