पाकिस्तान घाबरला! पंतप्रधान शाहबाज म्हणाले, ‘आम्ही चौकशीसाठी तयार आहोत’

एक जबाबदार देश म्हणून आपली भूमिका कायम ठेवत, पाकिस्तान कोणत्याही तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे', असंही शरीफ यांनी म्हटलं आहे. <br/>

पाकिस्तान घाबरला! पंतप्रधान शाहबाज म्हणाले, ‘आम्ही चौकशीसाठी तयार आहोत’
Edited Image

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सातत्याने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तान आता घाबरला आहे. पाकिस्तानचे सर्व मोठे नेते नैराश्यातून निराधार विधाने करत आहेत. अशातचं आता पाकिस्तानी पंतप्रधान शांततेचा मार्ग स्वीकारण्याबद्दल बोलले आहेत. पाकिस्तानातील काकुल येथील पाक मिलिटरी अकादमीमध्ये पासिंग-आउट परेडला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ म्हणाले, 'पहलगाममधील अलीकडील घटना ही सततच्या आरोप-प्रत्यारोपाचे आणखी एक उदाहरण आहे, जी पूर्णपणे थांबवली पाहिजे. एक जबाबदार देश म्हणून आपली भूमिका कायम ठेवत, पाकिस्तान कोणत्याही तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे', असंही शरीफ यांनी म्हटलं आहे. 

भारताच्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तान स्तब्ध – 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द करण्याबाबत घोषणा केली. पाकिस्तान या निर्णयामुळे खूप नाराज आहे. या निर्णयाबाबत बोलताना पाक पंतप्रधान म्हणाले, 'पाकिस्तानचे पाणी कमी करण्याचा किंवा वळवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही कोणत्याही धाडसाला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत आणि कोणीही याबद्दल कोणतीही चूक करू नये. हा देश 24 कोटी लोकांचा आहे आणि आम्ही आमच्या शूर सशस्त्र दलांच्या मागे उभे आहोत.' 

हेही वाचा – सिंधू नदी आमचीच राहील; नाहीतर रक्त वाहील: बिलावल भुट्टोंची पोकळ धमकी

शाहबाज यांनी म्हटलं आहे की, हा संदेश स्पष्ट आहे. शांतता ही आमची प्राथमिकता आहे आणि आम्ही आमच्या अखंडतेशी आणि सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही. तथापि, पाकिस्तानी पंतप्रधानांपूर्वी पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांनी वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, आता सिंधू नदीत पाणी किंवा रक्त वाहिलं. सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील.

हेही वाचा – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 'सुंता' पाहून दहशतवाद्यांनी हिंदूंना मारले; तपासात मोठा खुलासा

सखर येथे सिंधू नदीच्या काठावर एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना बिलावल म्हणाले की, 'मला सिंधू नदीजवळ उभे राहून स्पष्टपणे सांगायचे आहे की, सिंधू नदी आमची होती, आमची आहे आणि आमचीच राहील. या नदीत एकतर पाणी वाहेल किंवा आमचा वाटा हिसकावून घेऊ इच्छिणाऱ्याचे रक्त वाहिलं.'
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number