Google Year in Search 2025 : पहलगाम हल्ला नव्हे तर; नेटकऱ्यांनी गुगलवर सर्वाधिक शेफाली जरीवालाबाबत सर्च केल्या ‘या’ गोष्टी

गुगलच्या ‘टॉप मोस्ट सर्च्ड इव्हेंट्स 2025’ यादीत शेफाली जरीवाला 9व्या क्रमांकावर असून, पहलगाम हल्ला 10व्या स्थानी आहे.

Google Year in Search 2025 : पहलगाम हल्ला नव्हे तर; नेटकऱ्यांनी गुगलवर सर्वाधिक शेफाली जरीवालाबाबत सर्च केल्या ‘या’ गोष्टी

Google Year in Search 2025: सध्या 2025 या वर्षातील शेवटचा महिना सुरू असताना गुगलने वर्षभरातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या घटना आणि व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. महाकुंभ, पहलगाम दहशतवादी हल्ला, अहमदाबाद विमान अपघात यांसारख्या मोठ्या घटनांनी सर्च लिस्टमधील शीर्षस्थाने मिळवली असतानाच एक अनपेक्षित नाव टॉप 10 मध्ये झळकले. ते नाव म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला. आश्चर्याची बाब म्हणजे, शेफालीला पहलगाम हल्ल्यापेक्षाही अधिक वेळा शोधले गेले. गुगलच्या ‘टॉप मोस्ट सर्च्ड इव्हेंट्स 2025’ यादीत शेफाली जरीवाला 9व्या क्रमांकावर असून, पहलगाम हल्ला 10व्या स्थानी आहे. 27 जून 2025 रोजी केवळ 42 व्या वर्षी तिचे अचानक निधन झाल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. परिणामी, “कांटा लगा गर्ल” म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण, वय, करिअर याबाबत गुगलवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शोधण्यास सुरुवात केली.  

हेही वाचा –  Dharmendra’s Ashes Immersed in Ganga: धर्मेंद्र यांना अंतिम निरोप! सनी देओलने हरिद्वारमध्ये विसर्जित केल्या अभिनेत्याच्या अस्थी

शेफालीच्या मृत्यूचे कारण

प्राप्त माहितीनुसार, शेफाली जरीवालाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. अनेक वर्षांपासून ती वृद्धत्वविरोधी (anti-ageing) उपचार घेत होती. 27 जून रोजी घरातील पूजेदरम्यान तिने उपवास केला होता. मात्र उपवास असूनही तिने वृद्धत्वविरोधी इंजेक्शन घेतले, ज्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. संध्याकाळी तब्येत बिघडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा – Raj Nidimoru Ex-wife Emotional Post : 'तुम्हाला ड्रामा हवा असेल तर…'; समंथासोबतच्या लग्नानंतर राज निदिमोरूच्या पहिल्या पत्नीची भावनिक पोस्ट

शेफालीचा प्रवास

शेफाली जरीवालाला 2002 मधील “कांटा लगा” या सुपरहिट रिमिक्सने अफाट लोकप्रियता मिळाली. 2019 मध्ये ती बिग बॉस 13 मध्ये वाइल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून झळकली. याआधी ती 'बेबी कम ना' या वेब सिरीजमध्ये दिसली होती. शेफालीच्या अकाली मृत्यूने मनोरंजनक्षेत्राला मोठा धक्का बसला असून, तिच्या जीवन आणि कारकिर्दीबद्दल अद्यापही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number