PSU Banks Return: सरकारी बँकांचा शेअर बाजारात धुमाकूळ! 6 महिन्यात मार्केट व्हॅल्यू 5.75 लाख कोटींनी वाढली; ‘या’ बँकांनी दिला बंपर परतावा

सरकारी बँकांच्या या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा कर्जवाटपाचा वेग वाढला आहे. खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांनी दिलेला परतावा आणि कर्ज वितरणातील आघाडी यामुळे या बँकांचा दबदबा वाढला आहे.

PSU Banks Return: सरकारी बँकांचा शेअर बाजारात धुमाकूळ! 6 महिन्यात मार्केट व्हॅल्यू 5.75 लाख कोटींनी वाढली;  ‘या’ बँकांनी दिला बंपर परतावा

Investment Return: भारतीय बँकिंग क्षेत्रात सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा (PSU Banks) दबदबा पाहायला मिळत असून शेअर बाजारातही या बँकांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या 6 महिन्यांत या बँकांच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये तब्बल 5.75 लाख कोटी रुपयांची वाढ झाली असून त्यांची एकूण मार्केट कॅप 21.35 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांनी दिलेला परतावा आणि कर्ज वितरणातील आघाडी यामुळे दलाल स्ट्रीटवर सध्या सरकारी बँकाच केंद्रस्थानी आहेत.

निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये 34 टक्क्यांची झेप
गेल्या सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार, निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये 34% वाढ झाली आहे, तर याउलट निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स केवळ 7 टक्क्यांनी वाढला आहे. सरकारी बँकांमध्ये 'बँक ऑफ इंडिया' 50 टक्के वाढीसह अग्रस्थानी आहे. देशातील सर्वात मोठी बँक 'एसबीआय'च्या (SBI) शेअर्समध्ये 47 टक्के आणि युनियन बँकेत 42 टक्के उसळी पाहायला मिळाली. याशिवाय कॅनरा बँक, पीएनबी (PNB) आणि बँक ऑफ बडोदा यांनी 20 टक्के ते 39 टक्केपर्यंतचा दमदार परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.

कर्ज वितरणात खासगी बँकांना मागे टाकले
सरकारी बँकांच्या या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची 'क्रेडिट ग्रोथ' (कर्ज वाटपाचा वेग). तिसऱ्या तिमाहीत सरकारी बँकांची लोन ग्रोथ 14.5 टक्के राहिली, तर खासगी बँका 12 टक्क्यांच्या खाली राहिल्या आहेत. यामध्ये रिटेल, शेती आणि एमएसएमई (MSME) क्षेत्राला दिलेल्या कर्जांचा मोठा वाटा आहे. इंडियन ओव्हरसीज बँक 24.13 टक्क्यांच्या ग्रोथसह या शर्यतीत आघाडीवर आहे. या बँकेने गुंतवणूकदारांना 6 महिन्यांत 22 टक्के परतावा दिला आहे. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सनुसार, चांगल्या भांडवली स्थितीमुळे या बँकांनी आपले लक्ष्य वाढवले आहे.

हेही वाचा – Stock Market Crash: IT शेअर्समध्ये 18 वर्षांतील सर्वात मोठी घसरण; LIC आणि म्युच्युअल फंडांना 1.2 लाख कोटींचा फटका

सरकारी बँकांचा 'गोल्डिलॉक्स फेज'
तज्ज्ञांच्या मते, सरकारी बँका सध्या 'गोल्डिलॉक्स फेज' मधून जात आहेत. याचा अर्थ असा की, सध्या क्रेडिट ग्रोथ उच्च स्तरावर आहे, बुडीत कर्ज (NPA) गेल्या अनेक दशकांच्या नीचांकी पातळीवर आहे आणि बँकांचा नफा विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, बँकांनी आता मोठ्या कॉर्पोरेट कर्जांऐवजी लहान आणि अधिक नफा देणाऱ्या कर्जांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांच्या उत्पन्नाची गुणवत्ता सुधारली आहे.

गुंतवणूकदारांसाठी संधी आणि पुढील आव्हाने
एसबीआय सिक्युरिटीजचे सनी अग्रवाल यांच्या मते, सरकारी बँकांच्या शेअर्सची व्हॅल्यू अद्यापही खासगी बँकांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली संधी आहे. मात्र, बँकांसमोर 'कासा' (CASA) डिपॉझिट वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. लोक आता बँकांमध्ये पैसे ठेवण्याऐवजी म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. जर बँकांमधील ठेवींचे प्रमाण वाढले नाही, तर भविष्यात कर्ज देण्याच्या वेगावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा – Gold Rates : गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; सोनं 80 हजारांवर येणार? 'हा' बदल ठरणार मोठा टर्निंग पॉइंट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number