Shardiya Navratri 2025: माता दुर्गा आणि लक्ष्मीला प्रसन्न करून मिळवा सुख-समृद्धी! धनप्राप्तीसाठी करा हे सोपे उपाय

नवरात्री सण अत्यंत पवित्र सण मानला जातो. नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवदुर्गेची पूजा केल्याने धैर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि शौर्य वाढते.

Shardiya Navratri 2025: माता दुर्गा आणि लक्ष्मीला प्रसन्न करून मिळवा सुख-समृद्धी! धनप्राप्तीसाठी करा हे सोपे उपाय

Shardiya Navratri 2025 : सध्या सुरू असलेला नवरात्रीचा उत्सव हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गाच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. अनेक भक्त नऊ दिवस उपवास ठेवून देवीची आराधना करतात. नवदुर्गेची पूजा केल्याने धैर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि शौर्य वाढते.

ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रीमध्ये केवळ माता दुर्गाच नाही, तर लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याची ही उत्तम संधी असते. देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळवून धनप्राप्तीसाठी तुम्ही काही सोपे आणि प्रभावी उपाय करू शकता.

धनप्राप्तीसाठी नवरात्रीतील सोपे उपाय
कमळाचे फूल अर्पण करा: नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल (कमळगट्टा) अर्पण करा. हे फूल लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानले जाते. यामुळे घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.
लाल वस्त्र आणि श्रृंगार: माता दुर्गेला आणि लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र आणि श्रृंगाराचे साहित्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. लाल रंग हे शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे.
विशेष मंत्राचा जप: धनप्राप्तीसाठी दररोज स्नानानंतर देवी लक्ष्मीच्या किंवा दुर्गेच्या खालील मंत्रांचा जप करावा:
माता लक्ष्मीचा मंत्र: 'ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः।'
माता दुर्गेचा मंत्र: 'सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।'
कन्या पूजन: नवरात्रीत कन्या पूजन (कुमारी पूजन) करणे हे देवीला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. कन्यांना देवीचे स्वरूप मानून भोजन द्या आणि त्यांना दक्षिणा व भेटवस्तू द्या. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
तुळशीची पूजा: नवरात्रीच्या दिवसांमध्ये सायंकाळी तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून 'ॐ श्री महालक्ष्म्यै नमः' या मंत्राचा जप केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात, असे मानले जाते.
हे सोपे उपाय करून तुम्ही शारदीय नवरात्रीत माता दुर्गा आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवू शकता आणि आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि धनप्राप्तीचा मार्ग मोकळा करू शकता.

हेही वाचा – Navratri 2025: नवरात्रीत दक्षिणेश्वर काली मंदिराला भेट दिल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, जाणून घ्या मंदिराचा इतिहास

नवरात्रीत धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत?
1) नवरात्रीमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ॐ श्री महालक्ष्मीय नम: या मंत्राचा जप करा.
2) नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेची पूजा करा आणि आरती करा. ज्यामुळे धनप्राप्ती येते.
3) नवरात्रीत नऊ दिवस दिवा अखंड तेवत ठेवावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
4) नवरात्रीत पिवळ्या कपड्यात लवंग आणि सुपारी एक जोडी ठेवा आणि शेवटच्या दिवशी ती तिजोरीत ठेवा यामुळे धनप्राप्ती संभवते.
5) दुर्गा सप्तशती पठण नवरात्रीच्या सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी दुर्गा सप्तशती पठण करावे.
6) नवरात्रीत घरामध्ये लवंग आणि कापूर जाळा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
7) नवरात्रीत माता लक्ष्मीला नैवेद्यात खीर अर्पण करा.
8) पिवळ्या कपड्यात गुंडाळून नारळ अर्पण करावा. यामुळे शनिदोष दूर होईल.
9) या काळात नवीन वस्तूंची खरेदी करणेही शुभ असते. उदा., घरात लागणाऱ्या वस्तू, दागिने, वाहनखरेदी आदी.

हेही वाचा – Navratri 2025 : श्रद्धा, शुद्धी, आरोग्याचा त्रिवेणी संगम; ही आहेत नवरात्रीत अनवाणी चालण्यामागे धार्मिक, वैज्ञानिक कारणे
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number