Shani transit Revati nakshatra: शनिचा फेरा आलाच! 9 ऑक्टोबरपर्यंत ‘या’ 3 राशींची वाढणार चिंता; प्रत्येक पाऊल टाकावे लागेल जपून

शनीचे हे नक्षत्र संक्रमण प्रामुख्याने 3 राशींच्या लोकांसाठी मानसिक आणि आर्थिक आघाड्यांवर आव्हानात्मक ठरणार असून त्यांना अगदी जपून राहण्याची वेळ येऊ शकते.

Shani transit Revati nakshatra: शनिचा फेरा आलाच! 9 ऑक्टोबरपर्यंत ‘या’ 3 राशींची वाढणार चिंता; प्रत्येक पाऊल टाकावे लागेल जपून

Shani transit Revati nakshatra : ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला कर्म, शिस्त, न्याय आणि संयमाचा ग्रह मानले जाते. शनीच्या छोट्याशा हालचालीचाही मानवी जीवनावर आणि सर्व राशींवर मोठा प्रभाव पडतो. जेव्हा कुंडलीत साडेसाती, अडीचकी किंवा महादशा सुरू होते, तेव्हा व्यक्तीला जीवनात अनेक कठीण प्रसंग, संघर्ष आणि वाढत्या जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागतो, ज्याला शनीची परीक्षा म्हटले जाते. ज्योतिषांच्या मते, नुकताच 17 मे रोजी शनिदेवाने रेवती नक्षत्रात प्रवेश केला असून ते या नक्षत्रात 9 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहेत. शनीचे हे नक्षत्र संक्रमण प्रामुख्याने 3 राशींच्या लोकांसाठी मानसिक आणि आर्थिक आघाड्यांवर आव्हानात्मक ठरणार असून त्यांना ताकही फुंकून पिण्याची वेळ येऊ शकते.

मिथुन राशीच्या लोकांवर वाढणार कामाचा ताण
मे ते ऑक्टोबर हा काळ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत परीक्षेचा ठरू शकतो. या नक्षत्र बदलामुळे नोकरीच्या ठिकाणी अचानक जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल, ज्यामुळे मानसिक ताण आणि चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता आहे. या काळात कौटुंबिक आयुष्य आणि व्यावसायिक जीवन यामध्ये ताळमेळ राखताना मोठी कसरत करावी लागेल. पैशांची चणचण भासल्यामुळे अनेक महत्त्वाची कामे रखडू शकतात. उपाय म्हणून या 6 महिन्यांच्या काळात कोणताही मोठा आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय नियोजनाशिवाय घेऊ नका. मानसिक शांततेसाठी 'ओम शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा नियमित जप करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

सिंह राशीच्या बजेटवर होणार थेट परिणाम
सिंह राशीच्या लोकांसाठी मे ते ऑक्टोबर असे एकूण 6 महिने आर्थिक बाबींमध्ये अत्यंत चढ-उतारांचे राहतील. अचानक उद्भवणाऱ्या अनपेक्षित खर्चांमुळे तुमचे संपूर्ण महिन्याचे बजेट विस्कळीत होऊ शकते, तसेच पैश्यांअभावी काही व्यावसायिक प्रकल्पांना विलंब होईल. कामाच्या ठिकाणी गोष्टी सामान्य ठेवण्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा दुप्पट मेहनत करावी लागेल. या काळात कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो आणि आरोग्याच्या तक्रारीही उद्भवू शकतात. उपाय म्हणून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. दररोज सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्यदेवाला अर्घ्य देऊन प्रार्थना करा आणि रविवारी गरजू व्यक्तींना गहू किंवा गूळ दान करा.

हेही वाचा – Budh Uday : बुध ग्रहाचा उदय 'या' 5 राशींचे नशीब पालटवणार; नोकरी-व्यवसायात मिळेल अफाट यश! रखडलेली कामेही मार्गी लागतील

धनु राशीवर शनीची अडीचकी
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक गोंधळ आणि विनाकारण चिंतेने भरलेला असू शकतो. शनीच्या अडीचकीमुळे तुमच्या हातात आलेल्या किंवा प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये अचानक अडथळे निर्माण होतील. कार्यालयात किंवा व्यवसायात घेतलेले निर्णय अपेक्षेप्रमाणे फलदायी ठरणार नाहीत. घरातील वातावरण काहीसे ताणा-ताणीचे राहू शकते आणि वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत मतभेद वाढण्याची चिन्हे आहेत. उपाय म्हणून प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय, बुधवारी हिरव्या मुगाचे दान केल्याने बुध ग्रहाची कृपा होऊन निर्णयक्षमता सुधारेल.

नियमित उपायांनी कमी होतील अशुभ प्रभाव
ज्योतिषशास्त्रात शनीच्या नक्षत्रातील बदलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण त्याचा थेट संबंध व्यक्तीच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीशी असतो. जरी हा काळ कठीण असला, तरी संयम आणि योग्य उपायांच्या मदतीने शनीचे अशुभ परिणाम नक्कीच कमी केले जाऊ शकतात. या काळात वादविवादापासून दूर राहणे, कोणाशीही फसवणूक न करणे आणि प्रामाणिकपणे आपले काम करत राहणे हाच शनीच्या कोपापासून वाचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

हेही वाचा – Shanidev Blessings : या 6 राशींवर शनी देवाची असीम कृपा बरसणार; पुढील 6 महिने ठरणार सुवर्णकाळ, होणार प्रगती अन् मोठा धनलाभ 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number