SBI PO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1,500 पदांची मेगा भरती; ऑनलाईन अर्ज सुरू, पाहा सविस्तर

एसबीआय पीओ पदाची निवड प्रक्रिया एकूण तीन टप्प्यांत पार पडणार असून यामध्ये पूर्व परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Mains) आणि सायकॉमेट्रिक टेस्टसह मुलाखतीचा समावेश असेल.

SBI PO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1,500 पदांची मेगा भरती; ऑनलाईन अर्ज सुरू, पाहा सविस्तर

SBI PO Recruitment : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) वर्ष 2026-27 या कालावधीसाठी प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) पदांच्या भरतीची अधिकृत नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या मेगा भरती अंतर्गत देशभरात एकूण 1,500 रिक्त जागा भरल्या जाणार असून यामध्ये आरक्षित प्रवर्गातील जागांचाही समावेश आहे. या भरती प्रक्रियेत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ऑल इंडिया लेव्हलवर म्हणजेच भारतामध्ये कुठेही केली जाऊ शकते.

आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
– शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) घेतलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. जे विद्यार्थी सध्या पदवीच्या अंतिम वर्षात आहेत, ते देखील काही अटींच्या अधीन राहून तात्पुरता अर्ज करू शकतात.
– वयोमर्यादा: 1 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

तीन टप्प्यांत होणार निवड; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा
एसबीआय पीओ पदाची निवड प्रक्रिया एकूण तीन टप्प्यांत पार पडणार असून यामध्ये पूर्व परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Mains) आणि सायकॉमेट्रिक टेस्टसह मुलाखतीचा समावेश असेल. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
– ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरणे: 18 जून ते 8 जुलै 2026
– पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket): जुलै 2026 चा 2 रा किंवा 3 रा आठवडा
– पूर्व परीक्षा (Preliminary Exam): ऑगस्ट 2026
– पूर्व परीक्षेचा निकाल: ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2026
– मुख्य परीक्षा (Main Exam): सप्टेंबर 2026
– सायकॉमेट्रिक टेस्ट, ग्रुप चर्चा आणि मुलाखत: ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2026
– अंतिम निकाल (Final Result): नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2026

हेही वाचा – DRDO Paid Internship 2026: संरक्षण क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! DRDO कडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी पेड इंटर्नशिप जाहीर; 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज

अर्ज करण्याची सोपी पद्धत
पात्र उमेदवारांनी 8 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवून एसबीआयच्या अधिकृत करिअर पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा:
– सर्वप्रथम स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (sbi.bank.in) भेट द्या.
– होमपेजवर उपलब्ध असलेल्या 'SBI PO Recruitment 2026' या लिंकवर क्लिक करा.
– तुमचा चालू मोबाईल नंबर आणि वैध ईमेल आयडी टाकून नवीन नोंदणी (Registration) करून घ्या.
– नोंदणी यशस्वी झाल्यानंतर लॉगिन करून अर्ज काळजीपूर्वक आणि अचूक भरा.
– तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
– दिलेल्या ऑनलाईन पेमेंट माध्यमांचा वापर करून अर्जाचे शुल्क भरा.
– फॉर्म पूर्णपणे तपासून सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी कन्फर्मेशन पेजची प्रिंट काढून ठेवावी.

हेही वाचा – Paytm Job Recruitment: फिनटेक क्षेत्रातील मोठी घडामोड; मार्च 2027 पर्यंत Paytm करणार 4,000 कर्मचाऱ्यांची बंपर भरती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number