ATM Widrawal Charges : SBI एटीएम व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; आता एटीएमने पैसे काढणे पडणार महाग

बँकेने स्पष्ट केले आहे की, मूळ मोफत व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जाणून घ्या, हे अधिकचे शुल्क कोणासाठी लागू होणार आहे..

ATM Widrawal Charges : SBI एटीएम व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; आता एटीएमने पैसे काढणे पडणार महाग

State Bank Of India News : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कडून आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकेने एटीएम (ATM) आणि ऑटोमेटेड डिपॉझिट-कम-विथड्रॉवल मशीन (ADWM) वरील व्यवहार शुल्कात लक्षणीय वाढ केली आहे. इंटरचेंज फीमध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे बँकेने स्पष्ट केले असून, हे नवीन दर 1 डिसेंबर 2025 पासून प्रभावी झाले आहेत. जर तुमची मासिक मोफत व्यवहारांची मर्यादा संपली, तर आता तुम्हाला मशीनमधून पैसे काढण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त खिसा रिकामा करावा लागेल.

वाढीव शुल्काचा नेमका तपशील
बँकेने केलेल्या या बदलांमुळे बचत आणि पगार खातेधारकांवर आर्थिक परिणाम होणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये बँकेने शुल्कात सुधारणा केली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा ग्राहकांना वाढीव दरांचा सामना करावा लागत आहे.

– रोख रक्कम काढणे (Financial Transaction): इतर बँकांच्या एटीएममधून मोफत मर्यादा संपल्यानंतर पैसे काढल्यास आता 21 रुपयांऐवजी 23 रुपये अधिक GST आकारले जातील.
– गैर-आर्थिक व्यवहार (Non-financial Transaction): बॅलन्स चेक करणे किंवा पिन बदलणे यांसारख्या कामांसाठी आता 10 रुपयांऐवजी 11 रुपये आणि GST द्यावा लागेल.
– पगार खातेधारकांसाठी बदल: सॅलरी पॅकेज असलेल्या ग्राहकांसाठी इतर बँकांच्या एटीएममध्ये पूर्वी अमर्यादित व्यवहार मोफत होते, मात्र आता ही मर्यादा दरमहा 10 व्यवहारांवर निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा – RBI Orders Bank: केवळ 'कागदोपत्री' नियम पाळून चालणार नाही; RBI गव्हर्नरांनी बँकांना सुनावले खडे बोल

मोफत व्यवहारांची मर्यादा आणि नियम
बँकेने स्पष्ट केले आहे की, मूळ मोफत व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्वसाधारण बचत खातेधारकांसाठी इतर बँकांच्या एटीएममध्ये दरमहा 5 मोफत आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांची सवलत कायम राहील. ही मर्यादा ओलांडल्यानंतरच वरील वाढीव शुल्क लागू होईल. तसेच, स्वतःच्या बँकेच्या (SBI) एटीएमवर व्यवहारांची मर्यादा 10 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

कोणाला मिळणार दिलासा?
या नवीन दरवाढीचा फटका सर्वच खातेधारकांना बसणार नाही. बँकेने काही अपवाद जाहीर केले आहेत:
– BSBD खाती : एसबीआयच्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांसाठी सध्याच्या सेवा शुल्कात कोणताही बदल केलेला नाही.
– कार्डलेस व्यवहार : एसबीआय एटीएममधून 'कार्डलेस' (Cardless Cash Withdrawal) पद्धतीने रोख रक्कम काढण्याचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे मोफत आणि अमर्यादित राहतील.
– स्वतःचे एटीएम : एसबीआय डेबिट कार्ड वापरून स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी सध्याच्या सेवा शुल्कात कोणतेही बदल केलेले नाहीत.

हेही वाचा – Credit Card Limit : क्रेडिट कार्डची लिमिट कशी ठरवली जाते? जाणून घ्या बँकांचे गणित आणि तुमची आर्थिक 'कुंडली'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number