Margashirsha Sankashti Chaturthi 2025 : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला 'गणाधिप संकष्टी' म्हणून साजरी केली जाते. यावर्षी मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी केव्हा आहे, 7 डिसेंबरला की 8 डिसेंबरला, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या गणाधिप रूपाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते. अशी मान्यता आहे. पाहूया यंदाच्या 2025 या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी केव्हा आहे..
चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' म्हणतात. तर, अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला 'विनायकी चतुर्थी' म्हणतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःख आणि कष्ट नाहीसे होतात अशी लोकांची श्रद्धा आहे. पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी साजरी केली जाते. चला पाहूया, संकष्टी चतुर्थीची तारीख, चंद्रोदयाची नेमकी वेळ व गणेश पूजा कशी करावी.
संकष्टी चतुर्थी तिथी
मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी तिथी 7 डिसेंबर, रविवारी सकाळी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 8 डिसेंबर, सोमवारी संपेल. त्यामुळे गणाधिप संकष्टी चतुर्थी 7 डिसेंबर रोजीच साजरी केली जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:19 ते दुपारी 1:31 पर्यंत आहे. पूजेचा शुभ काळ संध्याकाळी 5:24 ते रात्री 10:31 पर्यंत आहे.
संकष्टी चतुर्थी महत्व
संकष्टी चतुर्थीचे महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख-शांती टिकून राहते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. गणाधिप संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होते. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते.
गणपतीला मोदक आणि लाडूंचा नैवेद्य
मोदक (Modak) हा भगवान गणेशाचा सर्वात प्रिय भोग आहे. त्यामुळे अखुरथ संकष्टी चतुर्थीला बेसन, तांदळाचे पीठ किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेले 11 किंवा 21 मोदक त्यांना अवश्य अर्पण करावेत. मोदक अर्पण करताना जीवनात सुख आणि यश प्राप्त होते. त्याचप्रमाणे, बूंदीचे किंवा बेसनाचे लाडू (Besan Ladoo) देखील गणपतीला खूप आवडतात. हे लाडू अर्पण केल्याने बुद्धी आणि ज्ञानात वाढ होते, तसेच नात्यांमध्ये मधुरता येते, असे मानले जाते.
फळे आणि कंदमुळांचा नैवेद्य
गणेशजींना केळी, खोबरे-गूळही अर्पण केले जातात. यामुळे घरात धन आणि सुख-समृद्धीचा वास होतो. यासोबतच, आपल्या सर्व कामांमध्ये यश मिळते. रताळे हे कंदमूळ आहे आणि त्याला सात्विक फलाहारामध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उकडलेले किंवा भाजलेले रताळे नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास जीवनातील सर्व विघ्न दूर होतात आणि अडलेली कामे पूर्ण होतात.
अखंड शांततेसाठी गणेशजींचा आशीर्वाद
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूर्ण विधीपूर्वक पूजा (Rituals) करणे खूप फलदायी ठरते. बुद्धी आणि विघ्नहर्ता असलेल्या गणपतीला त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण करून आराधना केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी व्रत ठेवणाऱ्या भक्तांना सुख, शांती आणि कल्याण यांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
पूजन मंत्र
ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्॥
ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा॥
हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एकूण खर्च किती आला? निधी कसा जमा झाला? जाणून घ्या…
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही. )