Sanae Takaichi: जपानच्या इतिहासात नवा अध्याय! LDP पक्षाच्या साने ताकाची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याची शक्यता

सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने (एलडीपी) साने ताकाची यांना आपल्या नवीन नेत्या म्हणून निवडले असून, त्या पुढील काही दिवसांत पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे.

Sanae Takaichi: जपानच्या इतिहासात नवा अध्याय! LDP पक्षाच्या साने ताकाची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याची शक्यता

Sanae Takaichi: जपानच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. देशाला पहिल्यांदाच महिला पंतप्रधान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने (एलडीपी) साने ताकाची यांना आपल्या नवीन नेत्या म्हणून निवडले असून, त्या पुढील काही दिवसांत पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या मतदानात ताकाची यांनी माजी पंतप्रधान जुनिचिरो कोइझुमी यांचे पुत्र शिंजिरो कोइझुमी यांचा पराभव केला. पहिल्या फेरीत कोणालाही बहुमत न मिळाल्याने दुसऱ्या फेरीत निर्णायक मतदान झाले. जर कोइझुमी जिंकले असते, तर ते जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले असते.

हेही वाचा – Lawsuit Against H-1B Visas Fee: H-1B व्हिसा शुल्कवाढीवरील वाद पेटला! ट्रम्प प्रशासनाविरोधात संघटनांनी ठोठावला कोर्टाचा दरवाजा 

ताकाची आता अशा काळात सत्तेत येत आहेत, जेव्हा एलडीपीला मतदारांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचे मोठे आव्हान आहे. 1955 पासून सत्तेत असलेल्या या पक्षासमोर वाढती स्थलांतरविरोधी भावना, वृद्ध लोकसंख्या आणि आर्थिक अस्थिरता अशी अनेक आव्हाने आहेत. नवीन नेत्या म्हणून निवड झाल्यानंतर ताकाची यांनी म्हटले, 'जपानने पूर्णपणे भिन्न संस्कृती आणि पार्श्वभूमी असलेल्या लोकांना येऊ देण्याच्या धोरणांवर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.' त्यांच्या वक्तव्याने देशातील स्थलांतर धोरणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – Hamas Accepts Trump's Peace Plan: हमासने दिली ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेला अंशतः मान्यता; कैद्यांच्या सुटकेसाठी तयारी आणि गाझा प्रशासन हस्तांतरावर चर्चा

दरम्यान, 64 वर्षीय ताकाची या माजी आर्थिक सुरक्षा मंत्री असून, माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या जवळ मानल्या जातात. येत्या 15 ऑक्टोबरला होणाऱ्या संसदीय मतदानात त्या विद्यमान पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची जागा घेऊ शकतात. एलडीपीकडे संसदेत सर्वाधिक जागा असल्याने त्यांच्या पंतप्रधान होण्याची शक्यता जास्त आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number