Alcohol Pouch Sale Ban: ‘ज्यूस’च्या नावाखाली दारूची विक्री? सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस; टेट्रा पॅक मद्यविक्रीवर देशव्यापी बंदीची मागणी

या पॅकेजिंगमुळे लहान मुले आणि तरुणांमध्ये दारूचे व्यसन वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाल्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना नोटीस बजावून उत्तर मागवले आहे.

Alcohol Pouch Sale Ban: ‘ज्यूस’च्या नावाखाली दारूची विक्री? सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस; टेट्रा पॅक मद्यविक्रीवर देशव्यापी बंदीची मागणी

Alcohol Pouch Sale Ban: सध्या बाजारामध्ये लहान मुलांच्या फळांच्या रसासारख्या (ज्यूस) दिसणाऱ्या टेट्रा पॅक आणि सॅशे (पाऊच) मधील दारूविक्रीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या पॅकेजिंगमुळे लहान मुले आणि तरुणांमध्ये दारूचे व्यसन वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाल्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना नोटीस बजावून उत्तर मागवले आहे. 'कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंकन ड्रायव्हिंग' या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणातील कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवले आहे.

'चिली मँगो', 'अॅपल थ्रिल' अन् फळांची चित्रे; कंपन्यांकडून दिशाभूल?
याचिकाकर्त्यांचे वकील विपिन नायर यांनी कोर्टात युक्तिवाद करताना कंपन्यांच्या चलाख कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. ते म्हणाले की, उत्पादन शुल्क कायद्यातील (Excise Act) 'बाटली' (Bottle) या शब्दाच्या अस्पष्ट व्याख्येचा गैरफायदा मद्य उत्पादक कंपन्या घेत आहेत. या टेट्रा पॅक्सवर 'चिली मँगो' किंवा 'अॅपल थ्रिल' अशी दिशाभूल करणारी नावे लिहून त्यावर आंबे आणि सफरचंदांची रंगीबेरंगी चित्रे छापली जात आहेत. हुबेहूब ज्यूसच्या डब्यासारखे स्वरूप असल्याने:

-लहान मुलेही नकळत किंवा गुपचूप याचे सेवन करू शकतात.
-धावत्या वाहनांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणाच्याही लक्षात न येता ही दारू सहज पिली जाऊ शकते.
-या लहान आकाराच्या पॅकिंगमुळे राज्यांच्या सीमा ओलांडून दारूची बेकायदेशीर तस्करी करणे सोपे झाले आहे.
-सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिगारेट किंवा तंबाखूच्या पाकिटांप्रमाणे या टेट्रा पॅकवर आरोग्यासाठी घातक असल्याचा कोणताही स्पष्ट इशारा किंवा वैधानिक चेतावणी नसते.

सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ काय म्हणाले?
हा सर्व धक्कादायक युक्तिवाद ऐकल्यानंतर, सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने यावर तीव्र चिंता व्यक्त केली. अशा प्रकारे छुप्या पद्धतीने दारू उपलब्ध करून देणे अत्यंत दिशाभूल करणारे आणि घातक असल्याचे मान्य करत न्यायालयाने केंद्र आणि राज्य उत्पादन शुल्क विभागांना त्यांचे अधिकृत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – India GDP Growth: पश्चिम आशियातील संकटाचा भारताला मोठा फटका; GDP वाढीचा वेग मंदावणार, संयुक्त राष्ट्रांचा इशारा

याचिकेतील प्रमुख मागण्या:
याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर स्पष्ट मागणी केली आहे की, 'मद्य बाटलीबंद करणे' (Bottling of Liquor) या प्रक्रियेची कायदेशीर व्याख्या केवळ काचेच्या बाटल्या किंवा दारू म्हणून सहज ओळखता येणाऱ्या विशिष्ट पात्रांपुरतीच मर्यादित ठेवली जावी. टेट्रा पॅक किंवा सॅशेमधील विक्रीवर देशव्यापी बंदी आणल्यास सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हीचे रक्षण करणे शक्य होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number