Dharmendra Health Update: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी गंभीर असल्याच्या आणि व्हेंटिलेटरवर असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या ठरल्या आहेत. कुटुंबातील सूत्रांनी “ते ठीक आहेत आणि केवळ रुग्णालयात वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत” असे सांगितले आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
धर्मेंद्र यांना गेल्या आठवड्यात मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, 'व्हेंटिलेटरवर असल्याच्या बातम्या निराधार आहेत. धर्मेंद्र गेल्या आठवड्यापासून रुग्णालयात आहेत, पण त्यांची प्रकृती स्थिर आहे. सनी देओल आज सकाळी त्यांना भेटून परतले आहेत. काही गंभीर असते, तर संपूर्ण कुटुंब तिथेच असते.'
हेही वाचा – Andesri Passes Away: साहित्यविश्वात शोककळा! तेलंगणाच्या राज्यगीताचे रचनाकार अंदेसरी यांचे निधन
हेमा मालिनींची प्रतिक्रिया
या महिन्याच्या सुरुवातीला धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विचारले असता हेमा मालिनी यांनी पत्रकारांना ते ठीक असल्याचं सांगितलं. त्यांच्या या उत्तराने चाहत्यांना दिलासा मिळाला होता.
नियमित वैद्यकीय तपासणी
दरम्यान, 31 ऑक्टोबर रोजी धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्या टीमने स्पष्ट केले होते की, 'हे केवळ नियमित वैद्यकीय तपासणीसाठी आहे. काहीही चिंतेचे कारण नाही. धर्मेंद्र ठीक आहेत. 'एका सूत्राने Mid-Day ला सांगितले की, धर्मेंद्र रोज रुग्णालयात ये-जा करण्याऐवजी सर्व चाचण्या एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी काही दिवस तिथेच राहणे पसंत करतात. वयाच्या 89 व्या वर्षी रोजच्या प्रवासाने त्यांना थकवा येते.' धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवनच्या ‘इक्कीस’ (Ekkis) या चित्रपटात दिसतील. या चित्रपटात ते अगस्त्य नंदा आणि सिमर भाटिया यांच्यासोबत काम करत आहेत.