Jana Nayagan Release Date: थलपती विजय यांच्या ‘जन नायकन’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी होणार रिलीज

प्रेक्षकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विजय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'जन नायकन' या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Jana Nayagan Release Date: थलपती विजय यांच्या ‘जन नायकन’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी होणार रिलीज

Jana Nayagan Release Date:  तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विजय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जन नायकन’ या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. खुद्द थलपती विजय यांनी चित्रपटाचे एक धमाकेदार पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विजय यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती स्वीकारून राजकारणात पूर्णवेळ सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याने, अभिनेता म्हणून हा त्यांचा अखेरचा चित्रपट असणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी या चित्रपटाचे महत्त्व आणखी वाढले आहे.

थलपती विजय यांनी शेअर केलेल्या नवीन पोस्टनुसार, हा चित्रपट आगामी 23 जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. समोर आलेल्या अधिकृत पोस्टरमध्ये विजय हे पोलिसांच्या गणवेशात, डोळ्यांवर गॉगल आणि हातात तलवार घेतलेल्या अत्यंत आक्रमक ॲक्शन अवतारात पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपट सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये प्रदर्शित केला जाणार होता; मात्र सेन्सर बोर्डाकडून (CBFC) वेळेत मंजुरीचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे याच्या प्रदर्शनाला मोठा विलंब झाला होता. आता सेन्सर बोर्डाने या चित्रपटाला ‘A’ म्हणजेच केवळ प्रौढांसाठीचे प्रमाणपत्र दिले असून, या चित्रपटाचा एकूण कालावधी 3 तास, 3 मिनिटे आणि 52 सेकंद इतका असणार आहे.

हेही वाचा – SC On Samay Raina: सुप्रीम कोर्टाचा समय रैनाला दणका; न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी ठोठावला 3 लाखांचा दंड

एच. विनोद यांचे दिग्दर्शन; तगडी स्टारकास्ट
या बिग बजेट चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक एच. विनोद यांनी केले असून, केव्हीएन (KVN) प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली व्यंकट के. नारायणन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटामध्ये थलपती विजय यांच्यासोबत मुख्य भूमिकेत पूजा हेगडे, बॉबी देओल आणि ममिता बैजू हे लोकप्रिय कलाकार स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दरम्यान, यापूर्वी एप्रिल महिन्यात या चित्रपटाची एक एचडी (HD) प्रिंट ऑनलाइन लीक झाल्याची धक्कादायक घटना घडली होती, ज्यानंतर पोलिसांनी कठोर कारवाई करत अनेकांना अटक केली होती. अशा अनेक अडथळ्यांनंतर आता हा ॲक्शन-पॅक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे किती नवे विक्रम प्रस्थापित करतो, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number